पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ ॥ ह्या अद्रिच्या नंतर पैलभागी ॥ है वर्तमान श्रुत होय वेगीं ॥ ॥ तेथील अग्रेसर हिंदुलोक || हो हर्षसिंधूंत बहूत गर्क ॥ १०॥ ॥ ज्यापासुनी क्लेश सदाहि घोर ॥ होती, असा जो यवनाधिकार ॥ ॥ तेर्णे तदा तेथिल लोक सर्व ॥ भोगीत होते कुदशा अपूर्व ॥ ११ ॥ ॥ दयाबहादूर ह्मणून आतां ॥ करीत तेथे अधिकार होता ॥ ॥ पाहोनि त्याचा अधिपत्यताप || लाजे शनीही स्वमनीं अनूप ॥ १२ ॥ ॥ संतोषवाया यवनाधिपास ॥ स्वलोभ तैसा पुरवावयास ॥ ॥ शोषी असा तो दुबळ्या जनांस ॥ ग्रीष्मर्तुची विस्मृति हो न त्यांस १३ । ॥ लहान मोठ अधिकारि तैसे ।। वित्त प्रजेचें हिसकीत ऐसें ॥ ॥ निःसत्व पोळी मधुमक्षिकांची ॥ जैशी, प्रजा त्यापरि होय साची । १४ ॥ ॥ ह्या म्लेंच्छराज्ये जन गांजलेले ॥ होते असे कीं बहु कोपलेले ॥ ॥ स्नेहें कुणी मेळवितां तयांतें ॥ ते सिद्ध होते भडकावयातें ॥१५॥ ॥ संतप्त का ते नसणार पोटीं ॥ विटंबना नित्य अशीच मोठी ॥ ॥ त्यांची घडे ह्या यवनांकडून || प्रत्येककर्मों पशुच्या समान ॥१६॥ ॥ धरून भेद "स्वपर" स्वचित्तीं ॥ हे म्लेंच्छ काकांसम नीचवृत्ति ॥ ॥ त्या श्रेष्ट हंसांसम हिंदुले कां ॥ गर्ने हिणावं जर लागले कां ॥१७॥ ॥ तरी तयांचा अभिमान कैसा || सोशील मोठा अपमान ऐसा! ॥ ॥ राखावयातें स्वमहत्व थोर ॥ होतील जीवावरही उदार ॥१८॥ ॥ जो हिंदुचा धर्म अनादि थोर ।। मांडोनि त्याची छलना अघोर ॥ ॥ फोडोनि तीर्थातिल पूत मूर्ति ॥ पाडोनियां जाळुनि मंदिरे ती ॥ १९ ॥ ॥ करोनियां गोवध देउळांत ।। घुसोनि आंगें यतिंच्या मटांत ॥ ॥ थुंकोनि तौंडावरती तयांचे ॥ लाथाळुनी नंतर त्यांस साचें ॥२०॥ ॥ यज्ञोपवीतें हरुनी द्विजांचीं । कीं आंतडीं तोडुनि काय त्यांचीं ॥ ॥ देऊनियां दुर्धर वेदनेस || स्वधर्मदीक्षा दिधूनी जनास ॥२१॥