पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५ ॥ भांग चवथा ॥ ॥ ॥ स्वराज्यहानी करण्या प्रवृत्त ॥ जो जाहला अल्पविवेकयुक्त ॥

  • दाभाडिया त्या वधुनी रणांत ।। होता मराठे मंग एकचित्त ॥ १ ॥ ॥ चोहीकडे सर्सुनि पेशव्याचे ।। झेंडे यशस्वी चिरकाल साचे || ॥ लावावया वीर अनेक हर्षी । वेगें निघाले यवनप्रदेशीं ।। २ ।। ।। योद्धे मराठे बलशौर्ययुक्त ।। स्थापावया संतत उत्तरेत ॥ ॥ सत्ता स्वतांची अवघे मिळून || होते विशेषकरुनी झटून ॥३॥ ॥ सिद्ध त्वरें ह्यासमयास ठीक ॥ करूनियां सैन्य विशाल एक ॥ ॥ + र्ते माळव्याभीतरिं धाडिण्याचे ।। श्रीमंत चित्तांत अणी स्वतांचे ॥४॥ ॥ प्रसिद्धयोद्ध्या चिमणाजिता ॥ सेनापती मुख्य करूनि आतां ।। ॥ नांवाजलेले समरीं अनेक || दे पेशवा त्यासह वीरलोक ॥५॥ ॥ अनेकयुद्धी मिळवोनि कीर्ति ॥ मल्हारजी सांप्रत शौर्यमूर्ति ॥ ॥ लोकांत गाजे सरदार साचा । विश्वाससिंधू जणु पेशव्याचा ॥ ६ ॥ ॥ ह्या थोर सेनेमधिं तुष्टचित्ते || बिनीवरी नेमुनि मुख्य त्यातें ॥ ॥ आज्ञापिलें त्याप्रत पेशव्याने ॥ प्रवेश तेथे करण्या त्वरेनें ||७|| ॥ स्वकीय मोठ्या अनिवार्य ओघ । अल्पप्रवाहांसम शत्रु वेगीं ॥ ॥ ओढीत है सैन्य पुढे प्रभावे । तापीस उल्लंघुनियां विसावे ॥८॥ ॥ घेऊनि योद्धे अपुले बलिष्ट || मल्हारजी वीर रणीं वरिष्ट ॥ ॥ निघून तेथून बहूत वेगीं ॥ हो प्राप्त विव्यादि सभी भागीं ॥९॥
  • इसवी सन १७३१ मध्ये त्र्यंबकराव दाभाडे, बाजीरावाबरोबर युद्ध करून लढाईत पडला.

↑ या माळव्याच्या स्वारीस इ० सन १७३२ मध्ये सुरुवात झाली.