पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ ॥ तो ह्याप्रसंगी अपुले जिवाचे ॥ घेऊनि यो रणशूर साचें ॥ ॥ सावैश वेगें गरुडासमान ॥ म्लेच्छोरगी शीघ्र पडे तुटून ॥ ८१ ॥ ॥ तो दैत धीर स्वमुखे स्ववीरां ॥ युद्ध स्वकाया करुनी पुढारी ॥ ॥ स्वचित्त लाभीं धरुनी जयाचे ॥ झुंजे स्वकार्थे स्वमर्ने स्ववाचें ॥८२॥ ॥ तेव्हां तयाचा अति उम्र मल्ल || विद्युल्लतेतुल्य सदा विलोल ॥ ॥ विराजुनीयां, यवनोदति ।। घुसे जणो दारुण दैत्यदंत ॥८३॥ ॥ हें शौर्य, हें धाडस, हा प्रताप ॥ पाहोनियां म्लेच्छ शिखंडिरूपं ॥ ॥ होऊनि भाल्याप्रत फार भ्याले ।। घेऊनियां जीव पळोनि गेले ॥ ८४ ॥ ॥ मल्हारजी आणि दुजे प्रवीर ॥ ह्यांनी असा विक्रम फार थोर ॥ ॥ रणांत केला, यवनेश तेणें । हो पेशव्याला नत पूर्णतेनें ॥ ८५ ॥ ॥ श्रीमंत तेव्हां मनिं हृष्ट फार ॥ जो लाभ हो त्यांतुन जाहगीर ॥ || मल्हारिला देउनियां बरीच । करी तयाते कृतकृत्य साच ॥ ८६ ॥ मध्ये घडलें. ह्या युद्धांत मल्हाराव होळकराने फार पराक्रम केला ह्मणून त्यास पेशव्याने बारा परगण्यांची जहागीर करून दिली. तिसरा भाग समाप्त.