पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ ॥ मल्हारजीतें बघतां तयातें ॥ येई स्मृती जो करि भांडणाते ॥ ॥ स्वारीत दिलोवरच्या स्वतांशीं ॥ तो वीर हाची गुणशीर्यराशी ॥ ७१ ॥ ।। मल्हारजीसन्निभ दिव्यरत्न ॥ स्वसैन्यकोशांत विराजमान ॥ ॥ व्हावें सदा, हें बहु त्याघडीस || वाटे गुणग्राहक पेशव्यास ॥७२॥ ॥ त्यातें दिलेल्या वचनास तेव्हां ॥ स्मरून आणीक मनांत एव्हां ॥ ॥ मागून बांडेकदमाकडूनी ।। घे पेशवा होळकरा स्वसेनीं ॥७३॥ ॥ मल्हारजी वीर रणी अजिंक्य ॥ जाणोनि हें पंचशताश्वमुख्य ।। ॥ त्या पेशव्याने करुनी स्वचित्ते ॥ स्थापीयलें योग्यपदीं तयातें ॥७४॥ ॥ स्वारी पुढें ही यवनप्रदेश || पहूनि विद्युत्सम दीप्तिराशी ॥ ॥ स्वराज्य है तोय जणो जिवंत || उत्पादुनी ती परते पुण्यांत ।। ७५ ।। * माजे पुढें जें रण खानदेशीं ॥ मल्हारजी त्यामधिं शौर्यराशी ॥ ॥ करी, हटे झुंजुनि फार, साचें ॥ वीराग्रणीत्व प्रकट स्वताचें ॥७६॥ ॥ स्ववीररूपी जणु भोंवत ।। घेरोनि तो म्लेंछ तदा प्रमत्त ।। ॥ रसातळीं घालुनि त्यांस वेगें ॥ दाऊदखानास पिटाळि आंगें ॥७७॥ ॥ कर्नाटकाभीतरिं पेशव्यानें ॥ 11 ॥ केली महाजी मग तींत शूर ॥ कीं दक्षिणेची ध्रुवकांति अन्य ।। ॥ स्वारी नृपाज्ञे बहुशूरतेनें ॥ मल्हारजी होळकरप्रवीर ॥ ७८ ॥ प्रख्याति ऐसी अपुली अनन्य ॥ ॥ स्थापी तिथें तो अढळ, स्वकीय ॥ दावोनि युद्धांत अपूर्व शैौर्य ॥ ७९ ॥ ॥ $ पुढे निजामासह पेशव्याचें ॥ प्रख्यात मोठे रण शूरतेचें ॥ ॥ गोदातटीं होय पलीकडे जें ॥ मल्हारजी त्यांत बहू विराजे ॥८०॥

  • हैं खानदेशांतलें युद्ध इसवीसन १७२४ मध्ये झाले ह्यांत बऱ्हाणपूर ये- थील सुभेदार अजीम उल्लाखान याचा दाउदखान सरदार यांस सिंदे होळकर यांनी पूर्ण पराजित करून पिटाळून लाविलें.

+ इ. स. १७२६ मध्ये बाजीराव पेशवे आणि फत्तेसिंगभोंसले ह्यांनी ही स्वारी कर्नाटकावर केली होती. $ हैं गोदावरीपलीकडे निजामासहवर्तमान झालेलें युद्ध इ० सन १७२८