पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ ॥ त्या पूर्वजांचे बहुशूवंशीं ॥ जन्मूनियां आपण शौर्यराशी ॥ ॥ स्वबंधुहत्या करुनी सदाही ॥ दोषी करार्वे शुभनाम तेंही ! ॥ ५९ ॥ युष्म । ॥ हें योग्य आहे अपणास काय ? ।। ह्मणून ऐसें करण्या अकार्य ॥ ॥ उद्युक्त होता ! शिव ! राम ! राम ! | विषाद चित्तास गमे प्रकाम॥६०॥ ॥ हे बांधवांनो । जरि कां तुह्मांस ॥ स्वलौकिकाची बहु होय आस ॥ ॥ स्वधर्म व्हावा न कदापि नष्ट ॥ वाटे तुह्मांतें जरि है अभीष्ट ॥ ६१ ॥ ॥ नानाप्रकारें पिंडिल्या स्वभूची ॥ येते जरी कींव तुह्मांस साची ॥ ॥ स्वराज्य सर्वत्र सदा खुलावें ॥ वाटे तुह्मांतें जरि हें स्वभावें ॥ ६२ ॥ ।। स्वदेश निर्लेंच्छ करावयाचा ॥ असेल गेली जरि ही स्ववाचा ॥ ॥ स्वतंत्रता हीच वरावयाची ॥ आहे प्रतिज्ञा जरि ही स्वतांची ॥ ६३ ॥ ॥ सारांश - सर्वत्र सदा सुखाचा ॥ "स्व" हाच शद्ध श्रुत आवडीचा !! ॥ व्हावा तसा शब्द " पर " प्रणष्ट ॥ वाटे तुह्मांतें जरि हें अभीष्ट ॥ ६४ ॥ ॥ तरी पहा हींच भयाण भारी ॥ नग्नास्त्रशस्त्र तुमचीं कहारीं ॥ ॥ आवेश तैसा अनिवार्य हाच ॥ भयंकर क्रोध तदेव हाच ॥ ६५ ॥ ॥ बा ! पावलेले स्फुरणास हेच || विशालबाहू तुमचे तसेंच ॥ ॥ या सर्व गोष्टींसहवर्तमान ॥ चला त्वरें सर्व तुह्मी इथून ॥ ६६ ॥ ॥ चला कुठे ? म्लेंच्छ बहुप्रमत्त ॥ टोकावया शीघ्र चला रणांत ॥ ॥ टोकोनि त्यांचा करुनी चुराडा ॥ लावूं यशाचा जयवंत झेंडा" ॥६७॥ ।। मल्हारजीहोळकराग्रणीचें ।। ऐकोनि हें भाषण सुज्ञतेचें ॥ ॥ रुद्रावतारी जणु हे प्रवीर | झाले स्वचित्तामधिं शांत फार ॥ ६८ ॥ ।। संतापदावानल पेटुनीयां ॥ विवेककल्पद्रुम जो जळाया ॥ ॥ पाहे, तया वाचविलें त्वरेनें ॥ ह्या दाटशा भाषणवर्षणाने ॥ ६९ ॥ || हें पेशव्याला श्रुत वर्तमान ।। होतांच आश्चर्य बहू गमून ॥ ॥ मल्हारजीतें बहुगौरवाने ।। बोलाविलें सन्निध शीघ्र त्यानें ॥७०॥