पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ ॥ ज्यांनीं यमाचे वसतीस जाणा ॥ धाडीयले सय्यदशेख नाना ॥ ॥ ते तीव्र खांडे दिसतात पात्र ॥ तुह्मांप्रती कां वधण्या स्वमित्र ! ॥ ४७॥ ॥ जे मोगलांचे मनिं बिंबवीती || योद्धा मराठा जणु कालमूर्ती ॥ ॥ ते बाण, बर्च्या, तरवारि, तेगे ॥ कां पात्र येथें धरण्यास वेगें ? ॥ ४८ ॥ ॥ बाणा मराठी विसरून गेला ॥ कां आज ? हो काय तरी तुह्मांला ? ॥ ॥ बाणा मराठी - यवनांस दंड देणें, असा तो विलसे अखंड॥४९॥ ॥ ही गोष्ट की आज तुह्मां स्मरेना ! ॥ कां दंड देण्या बघतां स्वतांना! || ।। येणें मराठी बिघडेल जूट | लक्षांत हैं आणित कां न नीट ? ॥५०॥ ॥ हें घ्याल लक्षामधिं कां जरी न ॥ जैसा गजा अंकुश त्यासमान ॥ ॥ हा जूट ज्या वांकवि सार्वकाल ।। तो म्लेंच्छ डोके वरती करील ॥ ५१ ॥ | डोकें तयाने वरती करून ॥ देऊनियां ताव भिशांवरून ॥ ॥ घरा लुटावें तुमच्या, बरें हैं | वाटे तुलां काय ? मला कथा है ॥ ५२ ॥ ॥ घरा लुटोनी मग उन्मदाने ।। कुलीननारी तुमच्या बलानें ॥ ॥ त्यांनी छळाव्या जणुकाय रानीं ॥ मृगी बहू निर्दय लांडग्यांनीं ॥ ५३ ॥ ॥ छळोनि नारी मग त्या खलांनीं ॥ दासी तयांना अपुल्या करोनी || ।। स्वकीय बीबींजवळी तयांस || ठेवून द्यावें पद सेवण्यास ! ।। ५४ ॥ || हैं गोड वाटे तुमच्या मनास ।। ह्मणून आतां करितां स्वनाश ? ।। ॥ जाई मराठ्यांतिल काय पाणी ! ॥ दुर्बुद्धि ऐशी सुचते ह्मणोनी ॥ ५५ ॥ ॥ जो म्लेंच्छ बारा रणि शीघ्र कापी ॥ स्वदेह एकेक असा प्रतापी ॥ ॥ विध्वंसुनीयां अपुल्याच हातें ॥ को अप्रतापी करितां तयातें ? ॥ ५६ ॥ ।। जें नाम होणार पराक्रमाने ।। स्तुत्यर्ह आणि अमर क्रमानें ॥ ॥ तें निंद्य आणि चिरनष्ट साच ।। कां हो! स्वतांचें करितां उगीच ? ॥ ५७॥ ॥ प्रताप ज्यांचा जींग जागरूक || असे महादैवत काय एक ॥ ॥ ज्यांनीं सुकृत्ये करुनी अनेक || स्वनाम केलें चिर निष्कलंक ॥५८॥