पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२.० ॥ सामर्थ्य योजून तदा समग्र ॥ स्वशस्त्र वेगें उपसून उम्र ॥ ॥ मल्हारजी कंदुकतुल्य त्याचा ॥ करी शिरश्छेद सगर्व साचा ॥३५॥ ॥ हे कृत्य शूरत्वविशिष्ट मोठे ॥ देखोनि योद्धे अवघे मराठे ॥ ॥ ‘शाबास ! शाबास ! ’ मुर्खे ह्मणाले ॥ शत्रू तसे फार मनांत भ्याले । ३६ । ॥ मल्हारजीशौर्य बघून गार्दै | प्रसन्न होऊन गुणज्ञ बांडे ॥ ॥ देई तदा पंचविसा हर्यांचें ॥ मल्हारजीला पतक स्तुतीचें ॥ ३७ ॥ ॥ पुढे, सदाही जयवंत झेंडे ॥ घेऊन सेनापति आणि बांडे ॥ ॥ जाण्या निघाले गुजराथदेशी ॥ मागीत तापीतट हो निवासी ॥ ३८ ॥ ॥ पराक्रमी सैन्यहि पेशव्याचे तापीतटी ह्या समयास पोचे ॥ ॥ हे वीर एके स्थळ मिश्र होतां ॥ हो त्याक्षणी ह्यापरि भास चित्ता ॥ ३९॥ ॥ नक्षत्रसंघामधिं ज्याप्रमाणें । आकाशगंगा अतुलप्रभेनें ॥ ॥ तापीनदी हो बहु त्यासमान ।। ह्या वीरसंघांत विराजमान ॥४०॥ ॥ ह्या दोन सैन्यांत पुढे प्ररूढ || कांहीं निमित्त कलह प्रचंड | ॥ होऊन दोन्हीकडचेहि लोक || उद्युक्त झाले लढण्या अनेक ॥४१॥ || पाहोनेि ऐसा कलहानि योर ।। मल्हारजी होळकरप्रवीर ॥ || सिंधूपरी क्षुब्ध अशा समाजीं ।। शिरून बोले सकलांस गाजी ॥४२॥ ।। " हे वीर हो ! हे यवनारिवीर ! स्वदेशमुक्तिद्रतधारिवीर ! ॥ ।। हे भीष्मभीमांपरि शूखरि! | कृष्णार्जुनातुल्यं यशत्त्विवीर ! ॥४३॥ ॥ वीरास र्जे योग्य न कृत्य साच । त्यातें तुह्मी आचरण्या स्वतांच ।। ॥ उद्युक्त झालां सगळेच कैसें ! || आश्चर्य वाटे मजला बहूसें ॥ ४४ ॥ ॥ जीं ग्लैडरकास सदा पिणारी ॥ तीं नग्नशस्त्रे तुमचीं कहारी ॥ ॥ योजावयाला अपसांमधींच || आहेत कां पात्र कदाहि साच ? |४५॥ ॥ जे नाचणारे रणि नेहमींचे ॥ छातीवरी खानपठाण यांचे ॥ ॥ ते उग्र भाले स्वजनांतरास || आहेत कां पात्र विदारण्यास ? ॥ ४६॥