पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

& १९ ॥ " घेऊन संगें मजला चलावें ॥ कोणीकडेही मग दूर जावे " ॥ ॥ तनूर्ध्वभागाप्रत डे|लवीत ॥ ती बोलली लाजत भीतभीत ॥ २३ ॥ ॥ " नेईन संगें तुज योग्य कालीं ॥ धरूं नको आग्रह तं अकालीं” ॥ ॥ बोलून ऐसें तिजला प्रसन्न ॥ करून तो जाय बळें तिथून ॥ २४ ॥ ॥ तो नंतरी उत्सुकते तिथून ॥ नंदूरबाराख्यपुरा रिघून ॥ ॥ बांडेगृहीं होय विराजमंत ॥ जाळींतुनी सिंहचकीं वनांत ॥ २५ ॥ ॥ निजाम अल्लीसह संगराचा ॥ येई त्वरें योग पुढे यशाचा ॥ ॥ मल्हारजीही समरप्रसंगा ॥ त्या शोभवी दावुन शौर्यरंगा ॥ २६ ॥ ॥ प्रमत्तयोद्धा यवनप्रवीर ॥ होता रणीं एक सगर्व थोर ॥ ॥ मल्हारजी सर्मुन त्याजवर्ती ॥ उड्डाण वेगें करि शौर्यमूर्ति ॥२७॥ ॥ तो म्लेंछही सर्सुन अग्रभागी ॥ काढून वक्षःस्थळ बाह्यभागी ॥ ॥ डौलांत जंब्या हलवीत शीघ्र ।। येई जणो राक्षस काय उग्र ॥ २८ ॥ ॥ भल्लप्रहारें अतिशीघ्रतेनें ॥ जंब्याच तो होळकराग्रणीनें ॥ ॥ अधःस्थलीं पाडियला सुदूर || तेणें चिडे! म्लेंच्छ मनांत फार ॥२९॥ ॥ तो क्रुद्व घोडा भरधाव काढी ॥ क्षणामधी होळकरास वेढी ॥ ॥ मल्हारजी ह्यासमयीं स्ववाजी ॥ त्यजून भूमिस्थित होय गाजी ॥ ३० ॥ ॥ होतांच भूमिस्थित फार वेगें ॥ ओढून अश्वावरुनी तयास ॥ ॥ ठोकूनि दंडाप्रत काडकाड ॥ ॥ भिडून त्याशीं निमिषांत अंगें ॥ मल्हारजी हो स्थित झुंजण्यास ॥३१॥ करून तैसा रणशब्द चंड ॥ ॥ मल्हारजी त्यावर झांप घाली ॥ कीं सिंह सांडावर शौर्यशाली ॥३२॥ ॥ त्याची गचांडी धरुनी संवेग ॥ दोदंडयुग्मी चुरुनी तदंग ॥ ॥ नैपुण्य पेचांमधलें अपूर्व ॥ दावून तगर्व हरून सर्व ॥ ३३ ॥ ॥ करूनियां जर्जर याप्रमाणे ॥ मल्हारजी बीर पराक्रमानें ॥ त्या म्लेंच्छवीरा अदळी धडाडा ॥ की राक्षसार्ते बलभीम गाढा । ३४ । ॥ युग्म ॥