पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ ॥ पाहून त्याच्या बहु आग्रहास || मामा तयाचा अनुमोदनास ॥ ॥ देऊन उत्तेजित फार त्याला ॥ करी रणीं गाजविण्यास भाला ॥ १२ ॥ ॥ ह्यानंतरी सुंदरगौतमेची ॥ आणी तिच्या प्रेमळ वल्लभाची ॥ ॥ एकीकडे गांठ पडे सुखाची ॥ की भूमिभागी विधुरोहिणीची ॥ १३ ॥ ॥ नथ अमोलिक जी तिचिया प्रभे ॥ जणु वसंतऋतूंतल रम्य ॥ ॥ बहु सुशोभित, जे बुरख्यामधीं ॥ खुलतसे जणु पर्णगणामधिं ॥ १४ ॥ ॥ स्ववदनांबुज रम्य असें निकें ॥ धरुन, स्वालति ती स्मित थोडकें ॥ ॥ करुन, बाजुस हंसगतीमधीं ॥ सरुन होय सलज्ज मनामधीं ॥१५॥ ॥ युग्म ॥ ॥ लावण्यशोभा बघुनी अपूर्व ॥ मल्हारजीचा स्थिरदेह सर्व ॥ ॥ हो विस्मयें कंपित, त्यांत भासे ॥ देवीच संचार करी स्वताबें ॥१६॥ ॥ घोटाळुनी किंचित तो ह्मणाला ॥ " ऐशी सदानंदनदी विशाला ॥ ॥ त्यजन, वाटे, न कुठेच जावें ॥ वाटे सदा तीतच मग्न व्हावें ॥ १७ ॥ ॥ परंतु पुष्टाजगराप्रमाणें ॥ भूभार एके स्थळी आळसानें ॥ ॥ होऊन बुध्या दिन घालवावे ॥ हें गोड वाटे न मला स्वभावें ॥ १८॥ ॥ तरी क्षणाचाहि तुझा वियोग ॥ करी सदाही ममचित्त भंग ॥ ॥ होऊनियां मी निरुपाय आतां ॥ निःरोप घेतों तव दुःखदाता” ॥१९॥ ॥ प्रियवचाप्रत ऐकत गौतमा ॥ उतरतो खरकन्मुखचंद्रमा ॥ ॥ रुचिर मान जरा लचकावुनी ॥ पदरती चुरि दुःखित होउनी ॥२०॥ ॥ प्रीती अशी व्यंजित गौतमेची ॥ पाहोनियां होळकराग्रणीची ॥ ॥ हो तुष्टि, आनंद सहस्त्रधारा ॥ चित्तास त्याच्या फुटल्या झरारा॥ २१ ॥ ।। समीप जाऊन तिच्या हनूला ॥ धरून तो तीस तदा ह्मणाला ॥ ॥ " हे सुंदरी उत्तर कां न देशी ? ॥ कां तूं मनुत्साह न वाढवीशी”॥२२॥ 66