पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. हैं काव्य रचून तयार झाल्यावर पुणे येथील दक्षिणाप्राईझ कमेटी- कडे कर्त्यानें परीक्षणाकरितां पाठविलें व कमिटीनें पंसत करून २०० रुपये बक्षीस दिले. दुर्दैवाने ह्या गोष्टीचे आधींच कर्त्यास काळाने गांठिलें, त्यामुळे आपली कृति विद्वानांस पंसत पडल्याने जो आनंद वाटावयाचा त्यास तो अंतरला, इतकेंच नाहीं, तर प्रस्तुत काव्यांत जे कांहीं अल्पस्वरूप दोष राहून गेले होते, त्यांचें शोधन त्याचेच हातानें होऊन जी सुधारणा व्हावयाची तीही झाली नाहीं. पण त्याहून जास्त हानि झाली ह्मगावयाची ती ही की, त्याचे हातून ज्यास्त योग्यतेचे अनेक ग्रंथ होण्याची आशा समूळ नाहींशी झाली. י कदाचित् झाले असते, ते किंबहुना सदर कारणामुळे प्रस्तुत ग्रंथ छापून प्रसिद्ध झालाही नसता. परंतु दानशूर व गुणग्राही आमचे श्रीमंत शिवाजीराव महाराज होळकर ह्यांनी आपल्या महाप्रतापी पूर्वजाचे आपल्या सेवकवर्गापैकी एकानें भक्तिपुरःसर केलेलें हें चरित्र सरकारी खर्चाने छापवून आह्मास फुकट देण्याचा हुकूम दिला, त्यामुळे हा सुयोग घडून आला. त्याबद्दल महाराज साहेबांचे जितके उपकार मानावे तितके थोडेच आहेत. रंघुवंशाप्रमाणे होळकर वंशावर मल्हारराव महाराजापासून आरंभ करून थेट शेवटचे तुकोजीराव महाराजापर्यंत साद्यंत २१ सर्गाचें काव्य करावयाचे, असा कर्त्याचा हेतु होता. त्याप्रमाणे हे पहिले चरित्र तयार झालें, तोंच शरीरक्षीणतेनें त्याजवर आपला अंमल