पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ भाग तिसरा ॥ ॥ मल्हारजी सांप्रत मातुलाचे || गेहीं वसोनी अपुल्या श्रमाचे ॥ ॥ निवारणातें करि काल कांहीं ॥ जसा दिनांतीं राव दिव्यदेही ॥ १ ॥ ॥ जिची स्वरूपाविश फार आख्या ॥ कन्या अशी सुंदर गौतमाख्या ॥ ॥ होती तयाच्या प्रिय मातुलास ॥ रम्या रमा ज्यापरि सागरास ॥२॥ ॥ उपवर स्थित सांप्रत ही असे ॥ तरुणता शरिरीं उदिता दिसे ॥ ॥ विकसिता लघुशी कळि ज्यापरी ॥ तशिच ही विलसे गुणसुंदरी ॥ ३ ॥ ॥ कन्या अशी पाहुन सूज्ञ तात ॥ विचार ऐसा करि तो मनांत ॥ ॥ जैसा सुभद्रेप्रत सव्यसाची || भाचा स्वतांचा वर हा तसाची ॥ ४ ॥ ॥ ह्या योजनेला जननी तियेची ॥ कदा न होती अनुकूल साची ॥ 66 " ' पाहून कोणी वर भाग्यवंत ॥ ॥ जैशी महाविस्तृत अद्विमाला | ॥ मध्यंतरी विघ्न करी तसेंची ॥ द्यावी सुता त्या" धरि ती मनांत ॥५॥ महानदी सागरसंगमाला ॥ योगाप्रती ह्या जननी तियेची ॥ ६ ॥ ॥ त्यागून वेर्गे अबला विचार ॥ कन्येप्रती बारगळप्रवीर ॥ ॥ मल्हारजी होळकराग्रणीला || देई रमा सिंधु जसा हरीला ॥ ७ ॥ ॥ सीतेवरी राघवराम जैसा ॥ मल्हारजी प्रेमळ कांत तैसा ॥ ॥ प्रीति स्वपत्नी वरतीच ठेवी ॥ स्वप्राण त्यातें गणि तीहि साध्वी ॥ ८ ॥ वृत्त झाल्यावर रुष्ट मामी ॥ लागे कराया कुरकूर धामी ॥ ॥ हैं ॥ बोले “घरीं फार तुरंग झाले ॥ ह्मणून आतां व्यय हा न तोले”॥ ९ ॥ ॥ तुरंगवृद्धी करण्यास मूळ ॥ मल्हारजीशौर्यच हो विशाल ॥ ॥ ह्मणून त्याच्या हृदयास साच ॥ ही उक्ति कापी जणु कर्तरीच ॥ १० ॥ ॥ बांडेगृही बारगिरी स्वतांची ॥ करावयाला दृढता मनाची ॥ ॥ करून, तेथून निघावयाचा ॥ विचार तो व्यक्त करी स्वतांचा ॥११॥