पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६ ॥ मल्हारजी नंतर सावकाश ॥ त्या अंबराईत करी प्रवेश ॥ ॥ देखोनियां सन्निध बाजिराव || वंदी तयात अभिमान पूर्व ॥ ७८ ॥ ॥ तेव्हां तयाच्या कृतिच्या स्मृतीनें ॥ मल्हारजीच्या हृदयीं त्वरेनें ॥ ॥ को पार्क थोडा प्रकडून दीत || तदेह तारे जणु सूर्यकांत ।। ७९ ।। ॥ ( तो बोलला " केवळ त्या घडीस || ढेकूळ होते हणिलें तुह्मांस ॥ ॥ उरांनी भल्ल न पार नेला ॥ हें चांगलें होय गमे मनाला " ।। ८० । ॥ वीरास शोभाप्रद फार साचा ॥ अहंकृतीचा बहु धाडसाचा ॥ ॥ उद्वार ऐसा परिसून त्याचा ॥ हसून बोले सुत पेशव्याचा ॥८१॥ " तसे कराया जर पाहतास ॥ तरी तुझें लनच त्या घडास ॥ 11 ॥ हरतांतल्या ह्या तरवारिसंगें ॥ लावीयले मीं असर्ते सुयोगें ॥ ८२ ॥ ॥ वाणी तुझी शुद्ध धनूप्रमाणें ॥ जरी विराजे बहु वक्रतेनें ॥ ॥ तरी सदा शोभसि वीर साचा ॥ गुणाप्रमाणें सरलांतराचा॥ ८३॥ ॥ आवेश ऐसा तव मी बघून || तुझ्यावरी फार असें प्रसन्न ॥ ॥ मी पेशवा होइन, तूंस एक ॥ देईन तेव्हां अधिकार ठीक " ॥८४॥ ॥ बोले तया होळकर प्रवीर ॥ कीं " आपणासन्निभ लोक थोर ॥ ॥ जरी अह्मांला धरतील हार्ते ॥ पावूं अलही तरी उन्नतीतें ॥ ८५ ॥ ॥ महाजनांचा महिमा असाच ॥ नीचोन्नतीला करणार साच ॥ ॥ धरून शंखाहि करीं हरीनें ॥ त्या धन्य केलें जनवंदनाने " ॥ ८६ ॥ ॥ प्रभाकरापामुन, संगमास ॥ त्यजून जैसा ग्रह सप्रकाश ॥ ॥ तैसा सुतापासुन पेशव्याचे ॥ स्थानीं रिघे होळकर स्वताचे ॥८७॥ ॥ उद्यानरूपी यवनप्रदेश ॥ भेदोनिया, त्यांत करून नाश ॥ ॥ गजावली तुल्यपराक्रमाची || अजिंक्यसेना मग पेशव्याची ॥ ८८ ॥ ॥ यशःप्रभा वीज जणो धरून ॥ जणो धनानें उदकें फुगून ॥ ॥ येई त्वरं तेथुन दक्षिणेला ॥ भासे मनाला जणुमेघमाला ॥ ८९ ॥ युग्म. ॥ भाग दुसरा समाप्त. ॥