पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५ ॥ होणार येणें अपुली कदा न ॥ लोकीं प्रतिष्ठा, हित ही तसें न ॥ ॥ सिंहां जरी कानुन देगिरीच ॥ निःसत्व होईल जनांत तोच॥६६॥ ॥ जरी न देई विलसूं स्वदेहीं || आकाश नक्षत्रगणा कदाही ॥ ॥ पडेल निस्तेज तरी स्वतांच ॥ न हा पराचा अपराध साच ॥ ६७ ॥ ॥ मल्हारजीतुल्यजनां ह्मणोनी ॥ क्षुद्रापराधास्तव अंतरानी ॥ ॥ घेऊंनये हें गमतें मनास ॥ अल्पज्ञ मी काय व विशेष " ॥ ६८ ॥ ॥ रुचून हें भाषण पेशव्यांत ।। मल्हारजीतें मग तुष्टाचत्तें ॥ ॥ नगावरूनी समजावुनीयां ॥ तो आणत्री सत्वर पूर्व टायां ॥६९॥ ॥ मल्हारजी जी अवधूतवृत्ति ॥ धरी, तिथेची करुनी निवृत्ति ॥ ॥ त्या पेशवा तोषवि शांतवोनी ॥ भक्ता जणो देवच काय कोणी । ७० । ॥ हा पेशवा नंतर मान्यतेनें ॥ मल्हारजीला अपुल्या धनाने ॥ ॥ समुद्र मेघास जसा जलानें ॥ प्रसन्न चितीं करि त्याप्रमाणें ॥ ७१ ॥ ॥ मल्हारजी होळकरांत वर्य ॥ ह्या बितला तुरग स्वकीय ॥ ॥ करी शतानें अधिक त्वरेनें ॥ ङ्कारत्व कृत्येंहि पराक्रमानें ॥ ७२ ॥ ॥ दावून मोठे कुशलत्व शौर्य ॥ हा पेशवा साधुन राजकार्य ॥ ॥ स्वकीर्ति ठेवून तिथेच, वेगें ॥ फिरे रिपुश्रीसमवेत मार्गे ॥ ७३ ॥ ॥ हैं सैन्य एके दिनिं पेशव्याचें || एक्या प्रदेशामधिं काननाचे ॥ ॥ छाया तरूंची बघुनी विशाल ॥ वस्ती करी तींत तदा खुशाल ॥ ७४ ॥ ॥ एकीकडे सोडुन सैन्य सर्व ॥ थोड्या मनुष्यांसह बाजिराव ॥ ॥ शोभे वनश्री वसती जणो जी ॥ त्या अंबराईमधिं जाय राजी ॥ ७५ ॥ ।। ह्या आडवाटे अनुयायिसाधं ॥ मल्हारजी होळकर प्रसिद्ध ॥ ॥ घेऊन संग तृण येत होता ॥ तो ह्या स्थलीं ये अवचीत आतां॥७६॥ ॥ संग वनश्रीरमणी अपूर्व ॥ घेऊन जो चोरुन बाजिराव || ॥ होता, तथा तोच चहूंकडूना ॥ मल्हारजी वाढे तुरंगमांनी ॥ ७७ ॥