पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ 9 || आज्ञा अशी निष्ठुर पेशव्याची || मल्हारजीला कळतां तयाची ॥ ॥ लाहीच होऊन तदा तयाचा ॥ प्रदीप्त कोपानल होय साचा ॥५४॥ ॥ तो गर्जला मेघ जणो अफाट । त्वे तदा चावून दांत ओंठ || ॥ सवेग ओष्ट स्फुरतां, तयाची ॥ जिंव्हा न हाले क्षणमात्र साची ।५५॥ ॥ कांहीं पळांनंतर तो कडाडे || तेणें मनीं धाक बहूत वाटे ॥ ॥ "चिंता न कांहीं, लुटुंद्या तयांस ॥ फांशीच कां देति न ते अह्मांस?॥५६॥ ॥ हें मृत्युहस्तासम लंबमान ॥ माझ्या करीं शस्त्र बहू भयाण ॥ ॥ आहे तयानेंच मदीय मान ॥ घेर्ती तथा पासून कापवून ॥ ५७ ॥ ॥ काड्या तृणाच्या उपटून दोन ॥ आणल्या, दंड असा ह्मणून ॥ ॥ हो लभ्य; वाः उत्तम गोष्ट साची ॥ कृपाच मोटी समजावयाची ॥ ५८॥ ॥ जो वृक्ष दे आश्रय तोच आंगें ॥ शाखाकरा झोकुनि फार रागे ॥ ॥ जरी शिरीं ताडण आश्रितांचे ॥ करी, तरी जीवित नष्ट साचें ॥५९॥ ॥ माझी तरी गोष्ट असे अशीच । मृतापरी सांप्रत मीहि साच ॥ ।। कर्तव्य मार्ते तरि काय आहे || राहून येथें श्रम घेत देहें ? " ।। ६० ।। ॥ तो बारगीरांस पुढे ह्मणाला ॥ " आहेत जे सिद्ध मरावयाला ॥ ॥ हो ज्यांस माझा अभिमान, त्यांनीं ॥ वेगें चलावें मजसार्ध रानीं ॥ ६१ ॥ ॥ बोलून ऐसें मग अश्व त्याने ॥ सोडून सारे दिधले त्वरेनें ॥ ॥ लावून रक्षा शरिरा, तिथूनी ॥ तो बारगीरांसह जाय रानीं ॥ ६२ ॥ ॥ होता तिथे पर्वत सान एक ॥ जाऊनियां त्यावरती विशंक ॥ ॥ तो वैसला वर्जुनि अन्नपाणी | जणो तपस्त्रीच तपार्थ कोणी ॥ ६३ ॥ ॥ कोणी स्वजातीय मनुष्य थोर ॥ स्वारीत होता सरदार वीर ॥ ॥ मल्हार बोला कळवी “ न धैर्य ॥ सोडी, अमी तूस अह सहाय" ॥ ६४ ॥ ॥ ह्यानंतरी तो सरदार गेला ॥ भेटावया सत्वर पेशव्याला ॥ ॥ बोले तया " होळकर प्रयाण ॥ अन्यत्र येथून करी रुसून ॥ ६५ ॥