पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ || दिल्लीपुररीच्या मग आसपास ॥ एक्या प्रदेशी करि सैन्य वास ॥ ॥ दे तेथला नायक खंड तेणें ॥ संधी असा सांप्रत हो त्वरेनें ॥ ४२ ॥ 11 “ की पेशव्याच्या कुणि सैनिकांनीं ॥ कापूनये तेथ तृणास रानीं ॥ ॥ मोडील जो ह्या नियमा बळेंच ॥ त्या पेशवा दंड करील साच " ॥ ४३ ॥ ॥ ॥ परंतु आवश्यक फार होतें ॥ मल्हारजीच्या तुरगांप्रती तें ॥ ह्या व्यत्ययें तो चिडला ह्मणून ॥ जो महापूरच वेगवान ॥ ४४ ॥ ॥ जैसा न मर्यादित सिंह मुक्त ॥ मल्हारजी ही नियमानुरक्त ॥ ॥ तैसा न होतां, तृण कापवूनी ॥ आणी त्वरें बारगिरांकडूनी ॥ ४५ ॥ ॥ एव्हां क्रमें देखत सैन्य सर्व ॥ तो पेशव्याचा सुत बाजिराव ॥ ॥ मल्हारजीच्या स्थलिं वर्ज्यघास ॥ आहे असें ऐकुनि ये सरोष ॥ ४६ ॥ ॥ मल्हारजीच्या मग बारगीरा ॥ तो पेशव्याचा तनुज प्रहारा ॥ ॥ करी करांतील लहान काठी ॥ मारून रोषांत तदीय पाठीं ॥ ४७ ॥ ॥ मल्हारजी ह्या क्षणि राहुटींत ॥ चहाट होता स्वकरें वळीत ॥ ॥ देखोनि तो हा दुरुनी प्रकार ॥ तापून गेला लवलाहि फार ॥ ४८ ॥ ॥ मल्हारजी हा बहु वीर मानी ॥ हें कृत्य भारीच अयोग्य मानी ॥ ॥ तो बाजिरावास हणी तिथून ॥ ढेकूळ कोर्पे विसरून भान ॥ ४९ ॥ ॥ तो लाल डोळे करुनी ह्मणाला ॥ " कां देत कांहीं असतां अह्मांला ? ॥ ॥ आह्मी उपाशींच जणो मरावें ॥ वार्टे तुह्मां काय ? मला कथावें॥५०॥ ।। आह्मां नसे वेतन नेमलेलें ॥ उत्पन्नभक्षी लुटिचे भुकेले ॥ ॥ आहों अह्मी ; लूट सुटेल कैशी । जी अन्नपूर्णाच असे अह्मांसी”॥५१॥ ।। त्या पेशव्याचा सुत उत्तरास ॥ देतां न, जाई तिथुनी सरोष ॥ । सांगून है वृत्त ह्मणे पित्याला । ' येणें कसा राहिल धाक ? बोला ॥५२॥ ॥ ऐशा अवाज्ञे बहु पेशवा तो ॥ हो क्रुद्ध, आज्ञा मग दे अशी तो ॥ ॥ — मल्हारजीहोळकरा त्वरेनें ॥ लुटून घ्यावे अगदीं बलाने '॥ ५३ ॥