पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ ॥ कदा कदा पक्षिविराव मंजुळ ॥ पडून कर्णी पुष्कळ ॥ सुख होय ॥ कदा कदा व्याघ्रगभीरगर्जनें ॥ दणाणुनी जात विशाल हीं वनें ॥३१॥ ॥ तंत्रु स्वयंभूच जणो सुविस्तृत ॥ जीं हीं वनें थोर मनास भासत ॥ ॥ सेना कधीं त्यांत विराम पावत ॥ पुढे पुढे चाल करी अबाधित ॥ ३२ ॥ ॥ पाहूनि डोळे फिरतात ज्यां, असे ॥ दरे कुठें खोल भयाण फारसे ॥ ॥ शिला अतिस्थूल गजाकृती कुठें ॥ आहेत मोठ्या डगरी तशा कुठें। ३ ३ ॥ ॥ कोंदाटले वृक्ष असंख्य ज्यांवर ॥ आहेत ऐसे तट हे जणो वर ॥ ॥ भासे, चढाओढ करून सत्वर । शीर्षी रिघाया बघती अगोदर ॥ ३४ ॥ ॥ विस्तीर्ण ऐसे गिरिभाग उन्नत ॥ आहेत बाजूस कुठें विराजत ॥ ॥ कुठे कुठे ते खडकाळ रुक्षसे ॥. आहेत अत्युच्च विशाल फारसे ॥ ३५ ॥ ॥ युग्म ॥ ॥ प्रचंडसे पांडुरघासवेष्टित ॥ पाहूनि ते उंचवटे कुठें स्थित ॥ ॥ भासे, सुखें वृद्धजटालराक्षस ॥ आहेत की निद्रित येथ बाजुस ॥ ३६ ॥ ॥ चकाकणारे रविच्या प्रभें दिनीं ॥ ह्मणूनि दृष्टी पडतात लांबुनी ॥ ॥ जे श्वेतसे फार, दऱ्यांतुनी तसें ॥ जे वाहणारे सकलत्र वक्रसे॥३७॥ ॥ प्रवाह ऐसे बघुनी नगीं स्थित ॥ भासे असें, वासुकिरज्जुवेष्टित ॥ ॥ कीं सिंधुच्या मंथनकाळिचा महा ॥ आहे इथे मंदरशैल काय हा ॥ ३८॥ ॥ युग्म ॥ ॥ |क्रमीत ऐसा पथ शूर सेना ॥ येतां नगाग्रीं यवनासुरन्ना ॥ ॥ हो भास ष्टष्टीं महिषासुराचे ॥ देवीच की पाद घरी स्वताचे ॥ ३९ ॥ ॥ असाच ती मार्ग पलीकडील || बहूतसा दुर्गम उंचखोल ॥ ॥ क्रमीत तेथून पुढे त्वरेनें ॥ सेना सरे अप्रतिबंधतेनें ॥ ४० ॥ ॥ ह्या भूमिची जी कटिमेखलाच ॥ ती नर्मदा गाठुन लागलींच ॥ ॥ घालीत डोळां रिपुच्याच धूळ ॥ सेना निधे की मग वाटूळ ॥ ४१ ॥