पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११ ॥ आकाशगंगातटिं ज्याप्रमाणें ॥ विस्तीर्ण मेघावलि त्याप्रमाणें ॥ ॥ ही पेशव्याची मग थोर सेना ॥ तापीतटीं होय विराजमाना ॥ १९॥ ।। सुतेस माता जाश त्याप्रमाणें ।। तापी नदी ही अपुल्या पयानें ॥ ॥ सानंद सेनेप्रत पेशव्याचे ॥ करी करोनी हरण श्रमांचें ॥ २० ॥ || विस्तारलेली जगु सागरानें ॥ तापीनदी ही स्वभुजा सुखानें ॥ ॥ निद्रेत भूमीवर, सैन्य तीतें ॥ उल्लंघुनी जाय पुढे पुढें तें ॥२१॥ ॥ विंध्याचलाच्या मग पायथ्यासी ॥ येऊन तें सैन्य तिथून हषीं ॥ ॥ पराक्रमाचा ध्वज उच्च भागीं । कीं रोवण्याला वर जाय वेगीं ॥२२॥ ॥ आलिंगिणारे गगना तरू असे ॥ विराजती ज्यांत बहूत दाटसे ॥ ॥ ऐश अरण्यें घनघोर त्यास्थलीं । मार्गांत तेव्हां किति तीस लागलीं । २३ ॥ ॥ वनांसभोंतीं सकलत्र हीरवी ॥ वृक्षां तदा जी बहुसांद्र पालवी ॥ ॥ शोभे तियेला वनदेविचा जणू ॥ नामी चिकाचा पडदाच की ह्मणं । २४॥ ॥ ह्या पालवींतून वनांतरामधीं ॥ सूर्योष्ण पावे न शिरूं जरा कधीं ॥ ॥ प्रयत्न अंश शिरण्यास खेटुनी ॥ करीत; कांहीं घुसत क्षणोक्षणीं ॥ २५ ॥ ॥ तेर्णे गमे मूटभर प्रभा करीं ॥ दिली असे की उधळोनि भीतरी ॥ ॥ पर्णांतुनी सूर्य अपूर्णसा दिसे ॥ भासे तिथें तो स्थित गुप्त की असे । २६ ॥ ॥ वृक्षीं कुठे पुष्पलता परोपरी ॥ खुलोनि, त्यांची गळुनी फुलें बरीं ॥ ॥ शय्या तयांच्या मृदुरम्य भूवरी । अपाप होत्या बनल्या वनांतरीं ॥ २७॥ ॥ वायू इथें मंद सुगंध शीतल || वाहून दे हर्ष मनास केवल ॥ ॥ कुठे कुठे नीरसपर्णमिश्रित ॥ होते वनांतून जलौघ वाहत ॥ २८ ॥ ॥ पर्णे तशी एकिकडेहि वाळलीं ॥ बहूत होतों पडली स्थलोस्थली ॥ ॥ कुठे कुठे शुष्क असे उभें तृण ॥ कुठे असे ते हिरवे हि त्यांतुन ॥२९॥ ॥ कदा कदा क्रूर गरीब घाबरे ॥ घे श्वापदे धांव समोरुन त्वरें ॥ ॥ कदा दिसे भेसुर येथ एकटा ॥ धनुष्यबाणांसह भिल्ल चोरटा ॥३०॥