पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० ।। पराक्रमी द्रोणसम प्रवीर ।। हा पेशवा घेउनि सैन्य शूर ॥ ।। उभारण्याला विजयध्वजास | दिल्लीमधीं थेट निघे सहर्ष ॥११॥ ॥ स्वांगांतलें दावित थोर पाणी | युद्धांगणी देत रिपूंस पाणी || ॥ ये पेशवा हा गुणि खङ्गपाणी || गोदावरीचें बघण्यास पाणी ॥१२॥ ॥ मल्हारजीला श्रुतवर्तमान ॥ होतांच है त्यामधिं, ज्यासमान ॥ ॥ मंत्र श्रुतीने बलभीमरूपीं || आवेश हो व्यक्त तसा प्रतापी ॥ १३ ॥ ॥ मल्हारजीच्या बहु आग्रहास | देखोनि मामा धनवंत त्यास ॥ ॥ स्वारांत जाण्या अनुमोदनास ॥ दे देउनीयां हय पंचवीस ॥ १४ ॥ ॥ ज्या पांढरे हैं उपनाम, ऐसा ॥ स्वारीत होता सरदार खासा ॥ ॥ मल्हारजीला भियमातुलाने || धाडीयले त्यासह ओळखीनें ॥१५॥ ॥ स्वारींत ह्या वेतनलाभ कांहीं । मल्हारजीला नव्हता कदाही ॥ ॥ जें प्राप्त हो बाहुपराक्रमानें ॥ हो तेच त्या वेसन मुख्यतेनें ॥ १६ ॥ ॥ स्वातींतली जीवनवृष्टि जैशी ॥ मुक्ताफलांनी युक्त शिंपल्यांसी ॥ ॥ करी लुटींतीलहि त्यापरीच ॥ तत्तुल्य लोकांप्रत सार्थ साच॥१७॥ ॥ ही पेशव्याची मग तेथुनीया ॥ स्वारी निघाली पहिली जिताया ॥ ॥ ती खानदेशांतुनि पार जाय ॥ अभ्रकभागांतुनि वीज काय ॥१८॥ +

  • सयद बंधूंस साह्य देण्याकरितां बाळाजी विश्वनाथ पेशव्याने जी दि- लीवर स्वारी केली ती ही होय. ह्या स्वारीत मल्हारराव होळकर होता असे मराठी बखरीत लिहिले आहे. थोरले बाजीराव आणि मल्हारराव होळकर यांच्या संबन्धानें पुढे ज्या आख्यायिका वर्णिल्या आहेत त्या मराठी बखरीतूनच घेतल्या आहेत.

+ परमुलखीं स्वारी करावयास निघालेल्या मराठी लष्कराबरोबर कोणी कोणी धाडसी लोक आपले जवळचे घोडे घेऊन लुटीच्या आशेनें त्या वेळीं जात असत अशी चाल असे. अशा लोकांस बरोबर येण्याविषयीं लष्कराच्या मुख्याकडून मनाई नसे; व त्याकडून त्यांना दरमहा नेमणूक वगैरे काही मिळत नसे. लुटीमध्ये जे प्राप्त होईल त्यावरच ते लोक आपला निर्वाह करीत असत; बहुशा दोन पैसे गांठी बांधून ते स्वदेशी परत येत असत.