पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग दुसरा २ ॥ जैसा विव पावुन शुक्लपक्षा | वर्धिष्णु तेजें सुख देत अक्षां ॥ ।। मल्हारजी त्यापरि यौवनास ॥ पावून सध्यां विलसे विशेष ।। १ ।। ॥ योध्यास आवश्यक, त्या गुणांस || संपादुनी गाजवि तो स्वतास ॥ ॥ तो मल्लविद्या तशि शस्त्रविद्या ॥ शिकून होता जणु भीम सध्यां ॥ २ ॥ ॥ ततुल्य भल्लभ्रमणी न कोणी ॥ मल्ल प्रसिद्ध स्थित त्या ठिकाणीं ॥ ॥ प्रचंड दोर्दंड अखंड पुष्ट || होते तप चे फिरले प्रकृष्ट ॥ ३ ॥ ॥ विस्तीर्ण वक्षःस्थल वजतुल्य ॥ जें हो प्रतिस्पर्धिमनांत शल्य ॥ ॥ तैसे बहू सुप्रभ तुंद गल्ल || शोभे तयाचें वदन प्रफुल्ल ॥ ४ ॥ ॥ तो चालतां प्रौढिमधीं स्वभावें ॥ भू पादभारे जणु कंप पावे ॥ ॥ ऐकोनि तल्छब्द गभीर चिप्प ॥ रडें त्यजोनी शिशु हो अपाप ॥५॥ ॥ होता असा तो जरि वीररूप ॥ तदीय अंतःकरणी अमूप ॥ ॥ क्षमास्वरूपी स्थित चंद्रिका ती ॥ सदा प्रकाशे बहुहर्षदा ती ॥ ६ ॥ ॥ करावया बाहुबलप्रसिद्धिं ॥ तो सिद्ध होता शिरण्यास युद्ध ॥ ॥ ये पेशवा सांप्रत या प्रदेशा || तेणें तयाची पुरि हो मनीषा ॥ ७ ॥ ॥ पिता जयाचा श्रुत विश्वनाथ ॥ बाळाजिला त्या पद राजदत्त ॥ ॥ मिळूनि एव्हां चिर पेशव्याचें ॥ तो अग्रणी होय बलें मतीचे ॥८॥ ॥ मंत्रांत इंद्राजवळी प्रवीण ॥ बृहस्पती ज्यापरि त्यासमान ॥ ॥ हा पेशवा छत्रपतीसमीप ॥ शोभे तदा बुद्धिबलें अनूप ॥ ९ ॥ ।। स्वीकारुनी छत्रपतीप्रभूचे || यशः सुगंधा जगतीतलाचे ॥ | संपूर्णभागी पसरीत जाय ॥ हा पेशवा होउनि वायु काय ।। १० ।।