पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| डोळे प्रकाश अगदी दिपून || आहों कुठे सांप्रत है सुचेन ॥ ॥ सिंहासनीं तों स्थित भव्य फार || मार्तंडमूर्ती दिसते समोर ॥ ५९॥ ।। करोनियां मंडल दासदासी || येती पुढे नाचत पुण्यराशी ॥ ॥ मर्यादशील स्थलि त्या नमूनी ॥ ते ठाकती होउनि गुंग गानी ॥ ६० ॥ ।। ती कोमलांगी मुरळी फिरून || धरून हस्ता स्वकरें तिथून ॥ ।। ने आपणा देवपदासभोर || ती नाचण्याला मग जाय दूर ।। ६१ ॥ ॥ त एक तेथें जणु तेज मूर्त ।। होता गभीराकृति वृद्ध भक्त ।। ।। तो लक्षुनी बोलत आपणास ॥ आहे, असा मानसिं होय भास।।६२॥ ।। " हे पुरुषा! देवकृपे नृवीर || भाचा तुझा होईल भूप थोर ॥ ।। || आहे तथा दाखविलें भुजंगें ॥ सुचिन्ह भावी प्रकटून अंगें ॥ ६ ३ ॥ ॥ उच्चारिलें भाषण है न तोंच ।। होतो सर्भोतीं जयघोष उंच ॥ ॥ स्वप्नीं असें भासुन त्यास, वेगें। तो उंच घोषा सरसाच जागे॥ ६४ ॥ ॥ सुस्वम तो देखुनियां खुशाले || नमून मार्तंडपदास बोले ।। ।। " हे देवदेवा सदया कृपाळा || हे दीनबंधो चिरलोकपाळा ।। ६५ ॥ ॥ तुझें कृपाछत्र जरी विराजे ॥ शिरी, तरी वीजहि तीक्ष्णतेजें ॥ ॥ समर्थ नाही करण्यास नाश ॥ शोभे तुझा हा महिमाप्रकाश ॥ ६६ ॥ ॥ करावया रंकसमान राव ॥ रावापरि रंक, समर्थ देव ॥ ॥ विश्वांत तूं शोभसि एक साचा । आह्मां मिळो अंश तुझ्या कृपेचा ” ॥ ६७ ॥ ॥ श्रुतिस्मृती ज्यापरि ऐक्यतेनें ॥ द्विजति सुस्वम तया प्रमाणें ॥ ॥ आहेत अर्थात बहू समान ॥ ह्मणून हो मातुल हर्षमाण ॥ ६८ ॥ ॥ मामा पुढे स्थाइक काम त्यातें ॥ सांगे यांचे घरच्या, स्वचित्तें ॥ ॥ तेणें गमे राजपदों रिघाया ॥ तो पायरी एक चढे क्षणीं या ॥ ६९॥ ॥ आणीक, बांडे कदमाख्य वीर || स्वामी असे जो अपुला उदार ॥ ॥ मामा स्वतांचा हय त्याजपाशीं ॥ मल्लारिना में करि एक ह ॥७०॥