पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

t ॥ होते कडे जे तुटले विशाल ॥ त्या सर्व भागामधं फार खोल ।। ॥ ते भासति,हा नग काय रोषीं ।। दाढा तदा घोर भयाण वाशी ॥४७॥ || होत्या बहू ज्या दिवट्या तयांत । प्रकाशल्या, त्या जणु भासतात॥ ॥ विक्राळ तोंडें गिरिवासुनीयां ॥ कीं हालवीतो लळळा जिभा या ॥४८॥ ॥ शिखामण्याचा करुनी प्रकाश ।। सहस्रजिंव्हा हलवीत शेषः ॥ ॥ येथें असे काय विराजमान ।। भासे तदा हा गिरि दीप्तिमान ॥४९॥ ॥ रत्नाकरांतून निघून आंगें । मैनाक रात्रीं वडवानि संगें ॥ : ॥ रमे इथे येउन काय गुप्त || भासे तदा पर्वत हा प्रदीप्त ।। ५० । ।। आनंददाते पहिल्याप्रतीचे || पदोपदी मंजुलगायनाचे ॥ ॥ आलाप कानीं इनुक्यांत येती ॥ वर्षे सुधा काय गमे सभतीं॥५१॥ || तशांत मार्तंड गुणानुवाद | करीत वांघेमुरळ्या समोद || || येतात येथे करतात छान ।। वीणामृदंगावर नृत्यगान ।। ५२ ।। ॥ करून भंडार सुवर्णचूर्ण ॥ मुष्टी तयानें अपुल्या भरून ॥ ॥ त्या दाट त्याची करतात वृष्टि ॥ जिच्यापुढे झाकुनि जाय दृष्टि ॥५३॥ 11 | येते तदा एक हळूं समीप ।। रंभेप्रमाणे मुरळी सुरूप ॥ 11 | स्वहस्त ती देउाने आपणास || नेते पुढें दूर, गमे मनास ॥ ५४ ॥ ।। येथेंहि कोटी दिवट्या धरून ।। आहेत वाघेमुरळ्या नवीन ॥ ।। येथेंहि आहे भर गायनाचा || त्या वर्णण्या काय वदेल बाचा ! ।। ५५ । || होतों न होतों स्थित या स्थलांत ।। तों गर्जना होउनि घोर त्यांत ।। 11 छेदोनिर्या पर्वतश्रृंग भव्य । बाहर ये सुंदर मूर्ति दिव्य ॥ ५६ ॥ ॥ सर्वत्र अत्यंत महा प्रकाश ।। तिच्या स्वरूपें पटुनी, विकास ॥ ।। दे मानसा तो सुखदायि ऐसा । लक्षावधी चंद्रहि दे न तैसा ॥५७॥ ॥ दिव्यप्रभ भूल जणो पडून ॥ थांबून तेव्हां क्षणमात्र गान ॥ ॥ पूरावरी पूर पुन्हा नवीन || येती तया अंबुधिच्या समान ॥ ५८ ॥