पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ पुढें नृपाचें पद पावणार ॥ ह्मणून आतांच भुजंग थोर ॥ ॥ करी फणाछत्र शिरावरी तो ॥ कीं पुच्छ तें चामर हालवी तो ॥२३॥ ॥ किंवा पुढें बालक हा स्वभर्ता ॥ होणार हे वाटुन काय चित्ता ॥ ॥ भू आपुला पाणि फणास्वरूपी ॥ देग्या तया आधिंच काय अर्पी॥२४॥ ॥ माता तयाची हुडकीत त्यास ॥ घेऊनि ये भोजन ह्या स्थलास ॥ ॥ तो नाग देखाने पुढे, तियेला ॥ दरारुनी घाम बहूत आला ॥२५॥ ॥ हा नाग येथें कुठुनी निघाला ॥ निद्रेत कैसा मम पुत्र ठेला ॥ ॥ ऐसें मुखें बोलत ती भिऊन । तेथेंच थांबे भुइला खिळून ॥ २६ ॥ || विक्राळ दाढेमधिं है यमाच्या || आहे जणों मूल भरी निजेच्या ॥ ॥ किंवा यमानें फणिरूप पाश ॥ की टाकिला प्राण हरावयास ॥२७॥ ॥ की मृत्यु काढी फणिरूप जिव्हा, ॥ चाटावया प्राण वनांत तेव्हां ।। ।। मातेप्रती ह्यापरि त्या घडीस || अत्यंत भीतिप्रद होति भास ॥ २८ ॥ ॥ तेथून धावून बहूत वेगें । बंधूस ती घेउनि येई मागें ॥ ॥ दावी फणी त्या सुतमस्तकींचा ॥ कीं निद्रित श्रीधरमस्तकींचा ॥ २९ ॥ ॥ होता वटीं एक कपी, तयास || वाटे तदा नाग जणो फणेस ।। ॥ धरूनि शीर्षी नवऱ्यामुलाचे ।। स्वरूप देई अबदागिरीचें ।। ३० ।। | ।। ' कां उत्सवाचा दिन आज ? ' है त्या ।। भासून तो लालफलें क्षणी त्या ।। . ॥ तोडी, विनोदें जणु नागशीर्षी ॥ गुलाल गोठ्यां सम त्यांस वर्षी ॥ ३१ ॥ ।। तेणें फणी तो डचकोनि अंतरीं । वेगें फणेतें अटपोन नंतरीं । ॥ की रक्षितें तें शिरिचें सुदर्शन || अदृष्ट हो वारुळिं लोक पाहुन ॥ ३२॥ ॥ ह्यानंतरीं मातुल आणि माता || धावूनि मल्हारिस जागवीतां ।। ॥ निद्रेतुनी तो उठला सजीव || जीवांत त्यांच्या मग येइ जीव ।। ३३॥ || मोती जसे अग्निमुखामधून || वायूंनी दीपक ज्यासमान ॥ ॥ निशाचर'पासुनियां सुधेचा ।। जैसा मिळावा घट एकदाचा ॥३४॥