पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ विस्तीर्ण शेर्ते रमणीय काळीं ॥ होतीं दुभागी बहु लागलेलीं ॥ ॥ वाहे तयांतून जलौघ नीट ॥ वेणींतला भांगच काय थेट ॥ ११ ॥ ॥ होता नदीच्या तटिं वाढलेला ॥ तरू वडाचा बहु फांकलेला ॥ ॥ छत्री शिरां पर्णमयी धरून ॥ वाटे निवारी जणु काय ऊन ॥ १२ ॥ ॥ छाया असे गर्द बहू तयाची ॥ घेण्या विसावा निजण्या सुखाची ॥ ॥ वाटे असे ही स्थित काय थेट | तेजोनिधीच्या मधिं एक बेट ॥ १३॥ ॥ ॥ येर्थे दुपारीं श्रमुनी उन्हाने ॥ त्रासूनि रानी बहु चालण्यार्ने ॥ ॥ केलं असे ज्यास बहू निचेष्ट || मल्हार तो ये हरण्यास कष्ट ॥१४॥ ॥ शिलेवरी ठेवुनि मस्तकातें ॥ घे झोप तो गाढ निवांत तेथे ॥ ॥ भासे शिलाग्री मुखपद्म त्याचें ॥ छायासरी स्थापित काय साचें ॥१५॥ ॥ कांहीं घडींनीं रवि तो नभांत || होई जरासा कलया गतींत ॥ ॥ खालीं तदा तो तिरपी कहारीं ॥ बाणांप्रमाणे किरणें झुगारी ॥ १६॥ ॥ तो वक्रदृष्टी वि पाहुनीयां ॥ वेर्गे शिलात्याग करुनि छाया ॥ पळे जणो होउनि सैन्य गोळा ॥ बघूनि तोफेंतिल लाल गोळा ॥१७॥ ॥ छायांबरा सारुनियां करांनी ॥ हा कोण येथे निजला ह्मणोनी ॥ ॥ त्या बालकाचें मुखपद्म वर्य ॥ केो बधे रेखुनि काय सूर्य ॥ १८ ॥ ॥ प्रतापशाली अपुल्याप्रमाणें ॥ होणार हा स्वीय पराक्रमानें ॥ ॥ सामर्थ्य त्याचें बघण्या ह्मणोनी ॥ जागे करी कीं रवि त्या करांनीं ॥ १९॥ ॥ स्पर्धा रवीची जणु देखनी ही ॥ वल्मीकवासी फणि दीर्घदेही ॥ ॥ फणा उभारुने बहिःप्रदेशीं ॥ येई हळू डोलत त्याजपाशीं ॥२०॥ ॥ ह्या बालकाच्या बहु तापलेल्या ॥ धर्मप्रवाहामधुं न्हाणलेल्या ॥ ॥ मुखारविंदावरतीं फणेस ॥ धरून छाया करि नाग त्यास ॥२१॥ ॥ मारीत होता किरणस्वरूपी || मुखास जे बाण रवि प्रतापी ॥ ॥ त्यां वारण्याला जणु काय ढाल || फणी करी हा स्वफणा विशाल ॥ २२ ॥