पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ बलिष्टवीरां चिर देइ जन्म ॥ ह्मणून कीं वीरकरोपनाम * ॥ ॥ त्यांच्याघराण्याप्रत सार्थ साजे || होते तसें पात्र जनस्तवा जें ॥ ३ ॥ ॥ §खंडोजी ह्या नामवेर्ये जनांत ॥ होता त्याचा चौगुले ख्यात तात ॥ ॥ आरामाला ज्यापरी पारिजात ॥ तैसा ताता हा करी शोभिवंत ॥ ४ ॥ ॥ तृतीयवर्षांमधिं पुण्यराशी ॥ तत्तात झाला शिवलोकवासी ॥ ॥ दायादपीडा मग फार होतां ॥ जाई तया घेउनि दूर माता ॥ ५ ॥ ॥ ती ये तळोद्यामधि खानदेशी ॥ पुत्रासवें नंतर बंधुपाशीं ॥ ॥ तो येथ नारायणजी स्वनामें ॥ बंधू असे बारगळोपना ॥ ६ ॥ ॥ मल्हार कांहीं मग थोर होतां ॥ करोनियां मातुल आणि माता ॥ ॥ विचार चित्तामधिं, चारण्यास ॥ ॥ एके दिनीं सूर्य नभी प्रदीप्त ॥ ॥ चालावया त्यावर जीवजंतु ॥ ॥ वाहे नदी एक वनांत शांत ॥ ॥ त्यातें जणू ऊन बहूत लागे ॥ वाहे तदा ओघ अभंग शांत ॥ ॥ जे अंशु होते पडले रत्रीचे ॥ मेंढ्या, तया धाडिति ते वनास ॥ ७॥ करी बहू तो वनभाग तप्त ॥ होते मनीं आणित फार किंतु ॥ ८ ॥ वाजे हळू तींतिल वारि कांत ॥ ह्मणून कीं तें कण्हण्यास लागे ॥९॥ मासा करी व्यंग उडूनि त्यांत ॥ त्या खाद्य तो जाणुनि काय नाचे ॥ १० ॥ आमच्या जवळच्या मराठी बखरीत असे लिहिले आहे कीं, होळकर ह्यांचे मूळचें उपनाम 'वीरकर ' आहे; होळकर हे उपनाम गांवावरून प्राप्त झालें आहे. मालकम साहेबाच्या मध्यहिंदुस्थानाचे इतिहासांत मल्हाररावाच्या पित्याचे नांव ' कोंडाजी ' असे दिले आहे.