पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्री थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य. भाग १ ला. कोण्याही विधि कुठे हि कुणिही कोण्याहि नामें स्वत ॥ ॥ भावें शुद्धमनें जया अळवितां ज्याची कृपा तत्वतां ॥ ॥ होते, जो करितो स्वरूप आपुल्या भक्तां निदानों, महा ॥ ॥ शोभे जो प्रभु विश्वचालक तया माझा नमस्कार हा ॥ १ ॥ ॥ जो विघ्नें अनिवार्यही पळवितों शुद्धांतरे प्रार्थितां ॥ ॥ जो चित्तीं करुनी प्रकाश सुपथीं नेतो पदीं लागतां ॥ ॥ मो जो पंगुच काय काव्य गहनीं चालू बघे त्या मला ॥ ॥ नेवो तो प्रभु पार देउाने बला हे मागणे त्याजला ॥२॥ ॥ बेलीस जैसे फळ त्यापरी जें ॥ नीरातटीं ग्राम लघु विराजे ॥ ॥ असे जया होळ मुरूम नाम | मल्हारिचा त्यामाधं होय जन्म + ॥ १ ॥ || रविकुळासम निर्मळ सोज्वळ ॥ धनगरांत खुटेकर जे कुळ ॥ ॥शिशु तयामधिं हा कुलनायक ॥ रविच ये उदया सुखदायक ॥ २ ॥ + ३० सन १६९३