पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ ही निराळी गोष्ट. ह्या दोन गोष्टी कांहीं अंशी परस्पर विरुद्ध होत. काव्य करावयाचे ह्यटलें ह्मणजे कवीनें नायकाच्या इतिहासांतील मनोवेधक व विस्मयकारक जेवढे कथाभाग असतील तेवंदच नि- वडून घेऊन इतर सामान्य गोष्टींकडे दुर्लक्ष्य केले पाहिजे. प्रस्तु काव्यांत कवीने जे प्रसंग निवडले आहेत ते निवडण्यांत त्याने चांगला योजकपणा दाखविला आहे असें माझ्याने ह्मणवत न माझ्या मतें माळवा सर केल्यानंतरचे मल्हाररावाचे अति सिद्ध पराक्रम झटले ह्मणजे वसईचा हल्ला व पानिपतची लढाई हे होत. हे दोन्ही प्रसंग जसे वणिले गेले पाहिजे होते तसे ते वर्णिले गेले नाहींत, व कवीने आपली लेखणी अगदी क्षुल्लक लढायांच्या वर्ण- नाकडे मुख्यत्वें उत्तराधीत खची घातली आहे. त्यामुळे काव्याचे निरनिराळे भाग सारखे समतोल झाले नाहीत. तथापि सर्ग ४ यांतील धार व उज्जयिनीचें वर्णन, सर्ग ९ यांतील कालिकेच्या मेळ्याचें वर्णन, व खंडोजीच्या मरणाबद्दल मल्हारराव व त्याची बायको ह्यांचा शोक, हे भाग उत्कृष्ट वढले आहेत. ह्या कल्य ( हा गृहस्थ बारला आहे असे हल्ली समजते ) आंगीं खरें कवित्व वास करीत होते हैं निः संशय आहे; व ागून एकंदरीने ग्रंथाचे योग्यतेचा विचार करितां २०० रुपयांचे बक्षीस द्यावे असें माझें मत आहे. ( सही ) मा० गो० रानडे. I agree with the secretary and R. B. Ranade, in recommending an award of Rs. 200 to the author of the work under review. (Sd.) KERU. L. CHHATRE.