पान:थोरले मल्हारराव होळकर सुभेदार यांजवर काव्य.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ असल्यामुळे चांगल्या विश्वसनीय आहेत. सारांश, अशा प्रकारच्या ग्रंथाचे मुख्य काम मनोरंजन करणें है होय, ज्ञान वाढविणें नव्हे, हे जरी खरें आहे तथापि प्रस्तुत काव्यांत जेवढी ऐतिहासिक माहिती येण्याजोगी होती तितकी सर्व आली आहे. केवळ प्रासास प्रास एकंदरीनें है काव्य उत्तम झाले आहे. जुळवणान्या तुटपुंज्या पद्यकाराचे दें काव्य निः संशय नाहीं. मधून नवून तर कवीस जसे कांहीं स्फुरण चढलें आहे, व त्या आवेशांत त्यानें खन्या कवित्वाचा प्रत्यय आणून देणाऱ्या कल्पना ओतून दिल्या आहेत. आरंभापासून शेवटपर्यंत सर्व काव्याची भाषा अगदी साधी व जोरदार आहे. आधुनिक कवितेचा जो मोठा दोष कीं तींत संस्कृत शहांचा व समासांचा भरणा भरपूर असावया - चाच, तो दोष प्रस्तुत काव्यांत बिलकुल नाहीं. ह्यांत मुख्य मुख्य वृत्ते लहान व गोड, ह्मणजे इन्द्रवज्जा, उपेंद्रवज्जा, उपजाति वसंततिलका, इत्यादि आहेत, यामुळे तिकडूनही काव्याची गोडी वाढली आहे. 'स्थलें' व 'प्रसंग' हुबेहुब बर्णन करण्याची शैली कर्त्यास चांगली साधली आहे असे दिसतें. नर्मदा व तापी ह्या नद्यांच्या सभोवारचा देखावा, सातपुडा पर्वतश्रेणीची अद्भुत व भव्य शोभा, पेशत्रे व बांडे ह्यांच्या सैन्यांस उद्देशून मल्हाररावाने केलेल्या आवेशयुक्त व वस्तृत्वप्रचुर वीरोक्ति, दया बाहादूर व मराठे यांमधील रणप्रसंग, व कालिकेच्या मेळ्यांतील चैनी पुरुष व स्त्रिया ह्यांचे नानाविध विभ्रम व चेष्टा, ह्या सर्वाचे वर्णनांत कवीची करामत चांगली दृष्टीस पडते. त्याचप्रमाणें मल्हारराव व त्याची स्त्री या उभयतांनी आपल्या एकुलत्याएक प्रिय पुत्राच्या मरणामुळे केलेला शोक, व