पान:तुतीपासून रेशीम.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५ घातलेली अंडी निरुपयोगी होतात. ती मादी बहुतकरून अंडी घालीतच नाहीं. ह्मणून सायंकाळचे चार वाजल्यावर युग्में सुटली नसल्यास तीं सोडविलींच पाहिजेत. माळ टांगून ठेवल्यावर तिच्या खालीं घमेलें ठेवावें. ह्मणजे, नर अथवा माद्या जो गलिच्छ रस टाकतात तो त्यांत पडतो. तसेंच निजोरी किडे त्यांतच पडतात. जोरदार फुलपाखरें प्रायः माळेबरून खालीं घसरत नाहींत. रोगट किडे वेंचून घमे- ल्यांत टाकावे. सायंकाळीं युग्में सोडविल्यानंतर नर फुल- पाखरें घमेल्यांत घालून तीं लांब टाकून द्यावी, व घमेलें स्वच्छ धुवून घरांत आणून ठेवावें. तो रस अथवा फुल- पाखरें आसपास टाकल्यास वाऱ्याबरोबर रोगाचे जंतु घरांत अथवा लागवडींत फैलावतील. फुलपाखरें जोरदार अस- ल्यास नऊ दिवस देखील जगतात. पण फुलपाखरें रोगट असल्यास एक दोन दिवसांतच मरतात. कित्येक लोक तसेंच युग्म उचलून डबडीत टाकतात, व सायंकाळचे चार वाजतां तींतून नर फुलपाखरूं काढून घेतात. पण ही रीत चांगली नव्हे. संयोग चालू असतां डबडीतील जागा वाण होते, व त्यांतच अंडी घातल्यावर अंड्यांचे कागद स्वच्छ न राहतां मलिन दिसतात. ह्मणून युग्म सुटल्यावर अथवा सोडविल्यावर फक्त मादीच डबडीत टाकावी. ज्या दिवशी फुलपाखरें अंडी घालतात, त्या दिवसापासून हवा- मानाप्रमाणे नऊ ते दहा दिवसांत अंडी फुटून किडे बाहेर येतात. सूक्ष्मदर्शक यंत्राचे साहाय्यानें माद्या तपासल्यावर