पान:तुतीपासून रेशीम.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ वड्या काढून घेऊन मोरचुदाचे पाण्याने धुवून पुढील खेपेकरितां ठेवाव्या. कागदावरील खरात्र फुलपाखरांच्या अंड्यांचा भाग कापून कागद गुंडाळ्या करून ठेवावे. कित्येक ठिकाणी नर फुलपाखरें त्याच दिवशी टाकून न देतां दुसन्या दिवशी कोसले फोडून बाहेर आलेल्या फुलपाखरांत नर कमी असल्यास त्याच नरांचा उपयोग करितात. अशा रीतीनें फुटलेल्या फुलपाखरांत नर कमी असल्यास आदल्या दिव- शींच्या नरांचा उपयोग केल्यास हरकत नाहीं. याचे योगानें किड्यांवर अथवा त्यांचे पुढील पिढीवर कांहीं विशेष परि- णाम होत नाहीं. छोट्या जातीच्या किड्यांची अंडी कशास तरी चिकटविलेली असतात. पण बड्या अथवा युरोपीय किड्यांचीं अंडीं मुटीं असतात. युरोपीय व बड्या किड्यांची अंडी फुटल्यापासून तों किडे पिकून ते कोसले करी पावेतों सर्व कृति निस्तरी किड्यांच्या सारखीच आहे. वार्षिक व द्वैमासिक किड्यांचीं अंडीं एकाच वेळीं फुटली असली, तरी द्वैमासिक किड्यांच्या जातीपेक्षां वार्षिक किड्यांच्या जातीस ह्मणजे निस्तरी वगैरे किड्यांस पिकण्यास सात आठ दिवस जास्त लागतात. वार्षिक किड्यांची अंडी मार्च महिन्याचे सुमारास फुटतात. हवेचें मान पंच्याहत्तर ते पंच्याऐशी असल्यास व या किड्यांचे काळजीपूर्वक संगो- पन केल्यास अठ्ठावीस ते तीस दिवसांत हे किडे कोसले तयार करूं लागतात. हवा थंड असेल तर वार्षिक जातीचे किड्यांस पसतीस ते चाळीस दिवस देखील लागतात.