पान:तुतीपासून रेशीम.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ करून मादीस अंडीं घालण्याकरितां माळेवरून काढून कागदावरील डबड्यांत एक एक याप्रमाणें टाकावें. सुपलींत कागद पसरून त्यावर एकास एक लावून डबड्या ठेवाव्या, व युग्मापासून सोडविलेली अथवा सुटलेली मादी एकेकांत एक एक याप्रमाणे ठेवावी. युग्मापासून सुटल्यापासून पंधरा ते वीस मिनिटांच्या आतबाहेर मादी बहुधा अंडी घालावयास सुरुवात करिते. व तें काम ती चार पांच घंट्यांचे आंत पुरें करिते. एक मादी तीनशे ते चारशें पात्रेतों, ज्या मानानें मादी सशक्त असेल त्या मानानें, अंडी घालते. एकेका डबडीत एकापेक्षां जास्त माद्या अंडी घालावयास सोडूं नयेत. नाहीं तर सूक्ष्मदर्शक यंत्रानें एक मादी दूषित ठरल्यास दोन्ही माद्यांची अंडी एका जागी असल्यानें निरनिराळी ओळखतां येत नाहीत. ह्मणून त्यांतील एखादी मादी रोगट असल्यास दोन्ही माद्यांची अंडी निरुपयोगी होतात. व अखेर तीं टाकावीं लागतात. ह्मणून प्रत्येक मादीचीं अंडी निरनिराळी ओळ- खतां यात्रीं, ह्मणून एकेका डबडीत एकापेक्षां जास्त माद्या अंडी घालण्याकरितां सोडूं नयेत. माळेवर एकादें फुल- पाखरूं होरपळल्यासारखें दिसल्यास तें काढून टाकावें. तसेंच निस्तेज असलेलीं फुलपाखरेही काढून टाकावीं. असल्या फुलपाखरांनीं घातलेलीं अंडी रोगट असतात. ह्मणून होईल तितकें करून जोरदार किड्यांचीच युग्में माळेवर जुळू द्यावीं. युग्म जर सोडविलें नाहीं, तर तें तसेंच चौवीस घंटे देखील रहाते. अशा बराच वेळ एकत्र राहिलेल्या युग्मांपैकी मादीनें