पान:तुतीपासून रेशीम.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ किडे ज्या दिवशी पिकतील असें वाटत असेल, त्याचे आदले दिवशी घंटा दोन घंट्यांकरितां मजुरीनें मणभर कोसले तयार करणारे किडे वेंचण्यास पंधरा माणसें किडे वेंचून चंदरकींत टाकण्यास ठरवून ठेवावीं. एक मण नाफे करतील इतके किडे वेंचावयास एक घंठ्यांत सहा माणसें लागतात. सारांश, किडे पिकल्याबरोबर ताबडतोब वेंचून चंदरकीत टाकावे. नाहीं तर आपल्या आवरणापैकी रेशमी तंतूचा भाग ते सुपलींतच टाकूं लागतात. व त्यानें रेश- माचा नाश होतो. जे किडे घाईनें सुपलीतल्या सुपलीतच ताबडतोब रेशीम घालूं लागतात, ते सर्वांपेक्षां जोरदार आहेत, असें मानण्यास हरकत नाहीं. जे किडे सुपलीत कोसले घालतात, ते अगदी लहान असतात. कारण त्यांस जितक्या व्यासाची जागा तेथें पाहिजे, तितकी न मिळाल्या कारणानें त्यांनी संकुचित जागेत कोसले घातल्या कारणानें कोसले बारीक होतात. असले कोसले त्रियांकरितां घेतले, तरी चालतें. कारण, रोगट असलेल्या किड्यांनीं कोसले घातल्या- कारणानें जसे लहान होतात, तसे ते नसतात. चंदरकत कोसले पूर्ण झाले, ह्मणजे दोन दिवस चंदरकींत किडे टाकून झाल्यावर त्यांतील नाफे काढून घ्यावे आणि स्वच्छ सुपलींत पसरावे.त्यांस मुंग्यावगैरे न लागतील याबद्दल खबरदारी घ्यावी. मुंग्या कोसल्यांस भोंक पाडून आंतील किडा खातात. ह्मणून चौखुरावर कोसल्याच्या तव्या ठेवून त्यांचे पायास तेल लावावें, हें बरें. आपणास बियाकरितां जितके कोसले पाहिजे