पान:तुतीपासून रेशीम.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ असतील, तितके चांगले निवडून काढून ठेवावे. व बाकीचे रोज घंटा दोन घंटे उन्हांत ठेवीत जावे. बियांकरितां जे कोसले ठेवावयाचे, ते चांगले, मोठे व त्यांतल्या त्यांत गोल असे पाहून ठेवावे. बियांचे कोसले सावलीतच ठेवावे. बियां- करितां कोसले ठेवावयाचे, ते एकाच दिवसाचे पिकलेल्या किड्यांचे ठेवावे. ह्मणजे त्यांपासून फुलपाखरें एकाच दिव- सांत होऊन एकाच दिवशीं तीं अंडी घालतील. बियांक- रितां राखून ठेवलेल्या कोसल्यांशिवाय अवांतर सर्व कोसले रोज दोन घंटे प्रमाणे उन्हांत ठेवावेत. ह्मणजे कोसल्यां- तल किड्यांची फुलपाखरांच्या रूपांतरांत जाण्याची शक्ति नाहींशी होईल. ह्मणजे, आंतील घुले वाळून जातील. एक दोन दिवस सपाटून ऊन देणें चांगलें नाहीं. कारण, अति- शय ऊन दिल्यास कोसल्यांचा रंग विटतो, व ते करपतात. या योगानें त्यांचें रेशीम रंगीन न निघतां त्यांपासून निघा - लेल्या तंतूंची मजबुती कमी होते. ह्मणून एकदम न देण्यापेक्षा थोडे थोडे दिलेलें बरें. बियांकरितां जे कोसले ठेवावयाचे, त्यांच्या माळा करून ठेवाव्या. ह्मणजे मुईनें प्रत्येक कोसला दोन्यांत ओवून त्यांची माळ करावी. सुईनें आंतील घुल्यास भोंक न पडेल, अशा रीतीनें कोसले दोऱ्यांत ओवावे. माळ करतांना कोसल्याची दोन्ही चिंचोळीं टोकें बाजूस रहावीं. आपणांस जितक्या लांबीची माळ हवी असेल, त्या मानानें ती लांब करावी. कोसले जर तसेच ठेवले, तर आंतील कोशवासी किडा आजूबाजूस कोठेतरी भोंक