पान:तुतीपासून रेशीम.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐशी ते पंच्याऐशींचे आंत असल्यास, व पहिल्या दोन काती टाकी पावेतों पांच वेळ, नंतर चार वेळ, व अखेरच्या स्थि- तत तीन वेळ, याप्रमाणें किड्यांस पाला वालीत गेल्यास, बावीस ते पंचस दिवसांचे आंत किडे पिकून तयार होतात. ह्मणजे, किडे लवकर अथवा उशिरा पिकविण्याचें आपल्या हातांत असतें, असें ह्मणणे अतिशयोक्तीचें होणार नाहीं. किड्यांची पिकण्याची वेळ सकाळचे सहा वाजल्या- पासून तों जवळ जवळ दहा वाजे पावेतों असते. सुपलीत पुष्कळ पिकलेले किडे सहा ते सात वाजे पावेतोंच नजरेस येतात. किडे पिकल्याबरोबर रेशमाचे तंतु काढून आपलेकरितां समाधिस्थ स्थितीत राहण्यास ते घरें तयार करूं लागतात; ह्मणजे, कोसले तयार करावयास लागतात. किड्यांनी त्यांतले त्यांतच कोसले बांधावयाचें काम सुरू केल्यास बऱ्याच रेशमाचा नाश होतो. ह्मणून तींतील किडे पिकल्याबरोबर ताबडतोब वेंचून एक घंठ्याचे आंत चंदरकीत टाकावे. एखाद दुसरा किडा पिकलेला दिसल्या- बरोबर सर्व किडे दोन दिवसांत पिकतील, असें जाणावें. ज्या दिवशी त्यांचा रंग साधारण बदललेला आढळेल, ह्मणजे किडे जोरदार व मोठे दिसून व तेजस्वीपणाची छटा त्यांवर दिसूं लागून त्यांचा रंग साधारण तांबूस दिसूं लागेल, त्याच्या दुसरे दिवशी ते किडे पिकतील, असें समजावें. किडा उलटा धरून जरा वांकविल्यास ज्यांच्या पोटांतील रंग गुलाबी दिसूं लागेल, ते किडे एक दोन दिवसांत पिकतील, असें समजावें.