पान:तुतीपासून रेशीम.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८९ असावी. उष्णतेच्या दिवसांत घरांत पाणी शिंपडावें, व वाया. च्यां विरुद्ध दिशेच्या एका दाराशिवाय सर्व दारे बंद करावी. ह्मणजे आपोआप अंधार होईल. तसेंच उघडलेल्या दारास गवताची जाळी लावून तीवर पाणी शिंपडावें, ह्मणजे घरांतील हवा थंड होईल. शेतांतून अथवा झाडावरून पाला तोडून आणावयाचा, तो तसाच उघडे गठ्ठे बांधून आणूं नये. धोतर अथवा चादर भिजवून त्यांत गुंडा- न पाला आणीत जावें. ह्मणजे आणतांना हवा लागून पाला सुकणार नाहीं. तसेंच जें कापड गुंडाळावयाचें, तें अगदीं थबथबलेले नसावें. सावलीत हमेषा पाला आणीत जावा. ह्मणजे सायंकाळचे पांच वाजल्यानंतर ते सकाळचे सात वाजण्याचे आंत केव्हांही आणावा. हमेपा घरांत एक दिवसाचा पाला शिल्लक ठेवीत जावा. गड्ढे आणल्यावर ते तसेच कापडांत गुंडाळलेले ठेवू नयेत. ठेवल्यास आंत अतिशय उष्णता वाढून आंतील पाला काळा पडतो. असा पाला किड्यांनी खाल्यास किडे काजळ्या रोगानें व्यापले जातात. घरांत पाला आणल्यावर माशा मारावयाचे घरांत जेथें तो सांठवावयाचा असेल, तेथें प्रथमतः खालीं गोणपाट अथवा तरट असें कांहीं तरी हांतरून पाला भिंतीला टेकून उभा करून ठेवावा, व त्यावर धोतर किंवा चादर ओली करून दिवसांतून दोन तीन वेळां टाकीत जावी. काजळ्या व लेग या दोन्ही रोगांच्या जंतूंनी किडे व्यापल्यास पंधरा वीस दिवसांचे आतच त्यांचा निकाल होईल. घरांतील हवा