पान:तुतीपासून रेशीम.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८८ केली पाहिजे. संवय असेल तर दर वेळ किड्यांची अंडी सूक्ष्मदर्शक यंत्रानें तपाशीत जावीं. परंतु जेथें वीं विक्री- करितां किडे पाळले जातात, तेथें केव्हांही सूक्ष्मदर्शक यंत्राचे परीक्षेशिवाय बी कोणीही वापरू नये. पारखलेल्या बियावर सशास्त्र रीतीनें पाळलेल्या किड्यांची अंडीं मोठे प्रमाणावर किडे पाळण्यास घेतल्यास चालतील. एकदां सूक्ष्मदर्शक यंत्रानें पारखून बीं घेतल्यास त्याच्या चार पिढ्या पावेतों किड्यांच्या संततीस क्वचितच रोग झालेला नजरेस पडतो. सूक्ष्मदर्शक यंत्राने तपासलेल्या अंड्यांस शास्त्रीय शुद्ध बीज ह्मणतात. व अशा बियापासून सूक्ष्मदर्शक यंत्राच्या परीक्षेवांचून घेतलेल्या अंड्यांस व्यापारी बह्मणतात. रोज एक माणूस पांचशे पावेतों किड्यांचीं अंडी तपासू शकतो. ह्मणजे, पांच दिवसांत एक माणूस पंचवीसशें बिया पारखूं शकतो. पण जेथें हजारों किड्यांचीं अंडी लागतात, तेथें प्रत्येक अंडी घालणाऱ्या मादीला तपा- सणें शक्य नसतें. तेथें व्यापारी बीं वापरले तरी चालेल. पण प्रत्येक वेळीं सूक्ष्मदर्शक यंत्रानें पारखलेलें बीं घ्यावें, हें चांगलें. थंडीच्या दिवसांत ज्या वेळीं हवाभारमापक यंत्र पडतें असेल, ह्मणजे हवा किडे पाळण्यास थंड असेल त्या वेळीं घराची सर्व दारे बंद करून किड्यांचे घरांत कोळशाचे शेगडीने उबारा करावा. किडे पाळीत असतांना घरांतील हवा समांतर ह्मणजे हवाभारमापक यंत्रामध्ये फार चढ उताराची नसावी, व ती अडसष्ट ते पंच्याऐशींचे घरांत