पान:तुतीपासून रेशीम.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८७ मापक यंत्र ठेवलेलें असावें. या यंत्राच्या साहाय्याने घरांतील हवा समशीतोष्ण आहे कीं नाहीं, हैं समजावयास बराच मार्ग होतो. घरांत हवा अतिशय उष्ण असल्यास व बाहे रील हवा थंड असल्यास वाऱ्याच्या विरुद्ध दिशेची खिडकी उघडी ठेवून वाऱ्याच्या साहाय्यानें आंतील हवा पाहिजे तितकी बेताची करून घ्यावी. व हवा थंड असल्यास सर्व खिडक्या व दारे बंद करावीं. हवा कोंडल्याच्या योगानें थोडी उष्णता घरांत उत्पन्न होते. तितक्या उष्णतेनें काम न भागल्यास शेगडीच्या साहाय्याने घरांत उबारा करावा. प्लेग रोगाचे जंतु किड्यांस जडल्यास त्यांची तीस दिवसांत पूर्ण वाढ होऊन ते किड्यांस मारण्या लायक होतात. ह्मणजे, प्लेगच्या रोगाने व्यापलेले किडे तिसाव्या दिवशी मेलेले आढळतील. तीस दिवसांचें आंत किडे पिकविल्यास किड्यांना प्लेगापासून प्रायः भय नसतें, असें झटल्यास चालेल. काजळ्या रोगाचा परिणाम वीस दिवसांत होतो. धुरळ्याच्या योगानें, तसेंच किड्यांस कमी पाला मिळाल्याने, या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळतो. नियमितपणाने वेळच्या वेळी पाला घातल्यास, शास्त्रीय रीत्या घर व इतर सामान शुद्ध केल्यास, व तसेंच वरील नियमांत न चुकतां किडे पाळल्यास, खात्रीनें किड्यांचें पीक रोगापासून संभाळले जाते. व त्यांच्या बियां- चर, अंडीं तपासल्या शिवाय, पुढें चार पिके घेतलीं, तरी त्यांचे संततीस रोगाचा प्रादुर्भाव झालेला आढळणार नाहीं. पण सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय सर्व कृती वर सांगितल्याप्रमाणें