पान:तुतीपासून रेशीम.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ शेर, व चवथ्या स्थितीत पंधरा ते वीस शेर प्रमाणे नव्वद शेर, व अखेरच्या दिवसांत रोज पांच मणापासून पंधरा मणा पावेतों पंचावन मण पाला किड्यांस लागतो. प्रत्येक खाणें घालते वेळेस चौखुराचे पायांस लावलेले तेल ओलें आहे कीं नाहीं, हैं पहात जावें. किडे लहान असतांना रोज पांच वेळ पाला घालीत जावा. पुढे अखेरीच्या स्थिती पावेतों रोज चार वेळ पाला खावयास घालीत जावा. त्याच्या वेळा दिवसा आठ वचार व रात्री आठ व चार याप्रमाणें ठेवाव्या. अखेरीच्या स्थितीत किड्यांस भरपूर, पण तीनच वेळ, पाला घालीत जावा. अखेरीच्या स्थितीत किडे पाला घातल्यापासून एक तासाचे आंत तो फस्त करितात, व वर डोके करून पाल्याची वाट पहातात. पण ज्याप्रमाणें लंघनाचे योगानें मानवी प्राण्यांस फायदा होतो, त्याचप्रमाणें किड्यांसही अखेरीच्या दिवसांत लंघन पाडल्यास फायदा होतो, व वाजवी- पेक्षां किडे अधिक सशक्त होतात. किड्यांच्या अखेरच्या स्थितीत पाला घालावयाच्या वेळा दिवसा बारा व रात्री आठ आणि चार याप्रमाणें तीन ठेवाव्या. किडे पाळावयाचें काम चालू असतां घरांतील केर फार जपून काढावा. घरांत धुरळा झाल्यास तो किड्यांवर बसून त्यांस काजळ्या रोग होतो. ह्मणून हमेषा धुरळा न उडेल, अशा रीतीनें हळू झाडावे. झाडविण्याच्या ऐवजीं प्रत्येक वेळी सारविलें असतां चांगलें. केर काढतांना पाणी शिंपून केर काढल्यास धुरळा उडण्याचा संभव नाहीं. किडे पाळावयाचे घरांत हवेचें भार-