पान:तुतीपासून रेशीम.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८५ पहिल्यापेक्षां तिपटीने मोठे होतात. ह्मणजे, पहिल्यापेक्षां ते तिपटीने अधिक जागा व्यापतात. किडे जसजसे मोठे होत जातात, तसतसा त्यांस मोठमोठा पाला चिरून घालीत जावा. किड्यांनी पहिली कांत टाकून ते आपल्या दुसन्या स्थितीत गेले, ह्मणजे त्यांस दाभणाच्या जाडी इतका पाला कापून घालीत जावें. ह्मणजे पहिल्या दिवशीं केंसा सारखा पाला घालतां वालतां किडे कातीस जाई पात्रेतों दाभणा- सारख्या जाडीचा पाला घालीत जावा. पुढे दुसन्या कातीच्या अखेरीस साधारण दोन गव्हांच्या जाडीचा पाला किड्यास चिरून घातीत जावा. ह्मणजे, थोडा थोडा जाड पाला कापतां कापतां तिसरे कातीच्या अखेरीस लहान लहान ढाप्या किड्यांवर घालीत जाव्या. किडे पहिल्या चार कांती टाकी पातों जितका पाला खातात, ह्मणजे किडे आपल्या पहिल्या चार स्थितीत जितका पाला खातात, त्याच्या अकरा पद पाला अखेरच्या स्थितीत खातात. पहिली कात टाकी पावेतोंच्या स्थितीत रोज किड्यांस दोन ते चार शेर पावेतों वाढता पाला खावयास लागतो. दुसन्या स्थितींत पांच ते दहा, तिसरींत दहा ते पंधरा, व चत्रर्थीत पंधरा ते वीस शेर पावेतों रोज पाला लागतो. व अखेरच्या स्थितीत एकंदर पंचावन मण पाला किड्यांस खावयास लागतो. ह्मणजे, पहिल्या स्थितीत दोन ते चार प्रमाणें पांच -दिवसांत पंधरा शेर, दुसच्या स्थितीत पांच ते दहा प्रमाणें पंचे- चाळीस शेर, तिसन्या स्थितीत अकरा ते पंधरा प्रमाणें पासष्ट ८