पान:तुतीपासून रेशीम.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आले, व त्यांत यश न आल्या कारणानें कित्येकांनी ते प्रयत्न सोडून दिले; याचें कारण, त्यांना सशास्त्र रीतीनें किडे पाळ- ण्याचें ज्ञान नव्हतें, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. रेशमाचे किड्यांस रोगाचें अतिशय भय असतें. व त्यांना शत्रु इतके असतात कीं, तितके इतर कोणत्याही प्राण्यांना नसतील. अंडी फुटल्यावर २० ते ४० दिवसांत किडे पिकून नंतर ते आपल्या तोंडाने तंतु काढून त्यांच्या जाळ्यानें आपलेसाठी समाधिस्थ स्थितींत रहाण्यास घरें बांधितात. रेशमाचा किडा जो तंतु आपले तोंडातून काढतो, तेंच रेशीम होय. तुतीचे किड्यांना होणारे कित्येक रोग इतके विचित्र व भयंकर आहेत कीं, किडे एक दोन दिवसांत पिकतील किंवा पिकत असतील, त्या वेळीं या रोगानें सर्व किड्यांचा एकदम संहार होतो. किडे अंड्यांतून फुटून पिकून रेशीम घालूं लागण्यापर्यं- तच महेनत व खर्च लागत असतो; आणि पुढे मेहनतीचा व खर्चाचा फारच थोडा भाग शिल्लक राहतो. किडे पिकूं लागल्यावर, ह्मणजे बहुतेक मेहनत व खर्च करून झाल्यावर, एकाएकीं किडे मरतात. व त्या योगाने एका दमडीचें ही उत्पन्न न होतां सर्व मेहनत व खर्च पाण्यांत जातो. व याच योगानें अनेक ठिकाणीं केलेले प्रयत्न नामशेष झालेले पहाण्यांत येतात. रेशमाचे किडे ज्या वेळेस रानटी स्थितीत होते, त्या वेळेस त्यांस रोगापासून बिलकूल भय नव्हते. पण अली- कडे या किड्यांमध्यें मनुष्याचे सान्निध्यानें अनेक रोगांची उत्पत्ति झाली आहे. रानटी व पाळीव