पान:तुतीपासून रेशीम.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ प्राण्यांमध्ये एक विलक्षण भेद नजरेस पडतो. पाळीव प्राण्यांस हरहमेप कसले तरी रोग होतात. व ते प्राणी रानटी प्राण्यां- पेक्षां निस्तेज व अशक्त असतात. हा परिणाम पारतंत्र्यानें व मानवी सहवासाने होतो, हैं सिद्धच आहे. तीच स्थिति या किड्यांची मुद्रां होय. श्रम केल्यावांचून आयतें खाव- यास मिळालेला माणूस ज्याप्रमाणें कोणच्या ना कोणच्या तरी कारणानें हमेषा कुथत असतो, त्याप्रमाणेंच या किड्यांची स्थिति होते. किड्यांच्या पूर्वकालीन स्थितींत त्यांना . आपले भक्ष्य मिळविण्यास बरेच श्रम करावे लागत असत. पाळलेल्या किड्यांस इकडचें तिकडे न हालतां त्यांचे भक्ष्य त्यांस मिळाल्याने ही जात रानटी जातीपेक्षां अतिशय नाजूक झाली आहे. या किड्यांना रोगांपासून व शत्रूंपासून अतिशय भीति आहे. तरी जर कोणी सशास्त्र रीतीनें किडे पाळील, तर खात्रीनें तो या किड्यांस रोगापासून अलिप्त ठेवून आपले काम साधून घेईल. सारांश, रेशमाचे किडे पाळणारास जर या धंद्याची सशास्त्र माहिती व अनुभव असेल, तर त्यास केव्हांही या धंद्यापासून नुकसान पोचणार नाहीं. इतकेंच नव्हे, तर हल्लींपेक्षांही तो किड्यांत विलक्षण सुधारणा करील. सशास्त्र रीतीनें किडे पाळल्यास किडे मरणार नाहींत, इतकेंच नाहीं; पण उलटपक्षी त्यांच्यापासून पुढें जी प्रजा उत्पन्न होईल, तीस देखील रोगापासून क्वचितच भय राहील. ह्मणून प्रत्येकानें पायाशुद्ध किडे पाळण्यास सुरुवात करावी, ह्मणजे त्यास अनुसरणारे देखील