पान:तुतीपासून रेशीम.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ असूनही या जातीचे किडे पाळण्याकडे दुर्लक्ष असण्याचे कारण, त्यांचें सालांतून नैसर्गिक रीतीने एकच पीक घेतां येदें, हें होय. व या जातीचे किड्यांवर हा धंदा कर णारास या किड्यांची दहा महिने उस्तवारी करावी लागते. ह्मणजे त्यांना या किडयांचीं अंडीं पाळण्याशिवाय दुसरें काम नसणें हें असावेंसें वाटते. युरोपियन व बड्या किड्यांत किड्यांच्या अनेक जाती आहेत. शास्त्रीय रीतीनें वार्षिक किड्यांची देखील पांच सहा पिके घेतां येतात. युरोपियन किडे व बडे किडे दुसऱ्या जातीपेक्षां दिढीने मोठे असतात. साहित्य. रेशमाचे किडे पाळण्यास घर, सुपल्या, जाळ्या, चौखूर पाला, सुरी, ठोकळा, चंदरक्या, बीं, पत्रा, सूक्ष्मदर्शक यंत्र, मोरचूद, गंधक, चुना, कोसले, कातम्या ठेवण्यास जागा, पेच्या वगैरे सामान लागतें. व हें सामान अगोदर तयार असल्या- खेरीज किडे पाळावयाचें काम सुरू करूं नये. सर्व साहित्य तयार असल्याखेरीज धंदा सुरू केल्यास, तो करणारास मेहनत व त्रास पडून किडे पाळण्याच्या कामापासून एक प्रकारें आनंद होण्याऐवजीं कंटाळा येईल. सशास्त्र किडे पाळावयाचे झटले ह्मणजे त्यास पहिल्यानें टापटीप, वक्तशीर- पणा व स्वच्छता यांचें अवलंबन केले पाहिजे. आजपर्यंत अनेक ठिकाणी रेशमाचे किडे पाळण्याचे प्रयत्न करण्यांत