पान:तुतीपासून रेशीम.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ कात ह्मणजे त्वचा. पहिली त्वचा मळकट असते, व नवी स्वच्छ असते. किडे त्या त्वचेंतून थोडे बाहेर निघाले, ह्मणजे त्यांच्या तोंडाकडील भागाची त्वचा थोडी स्वच्छ अथवा अधिक पांढरी दिसते. व जुन्या त्वचेचा भाग अंगावर थोडा अधिक काळसर दिसूं लागतो. किड्यांचा रंग असा दिसूं लागला, व ते हालचाल करीत नाहींत असें दिसूं लागलें, ह्मणजे ते किडे कात टाकीत आहेत, असें समजावें. बुरशी, ह्मणजे मस्करडाईन या नांवाचा रोग, किडे पहिल्याने कात टाकीत असतांना त्यांच्यांत फार सौम्य तऱ्हेनें नजरेस येतो. त्या वेळीं कांहीं किडे या रोगानें मेलेले आढळतात. मेलेले किडे वेंचून काढून किडे घरांत अस- तानांच घर सारवून गंधकाची धुरी द्यावी. पण वर सांगि- तल्याप्रमाणें जर किडे पाळले जातील, तर या रोगापासून भय बाळगण्याचे कारण नाहीं. सर्व किड्यांचें कात टाका- वयाचें काम संपल्यानंतर किड्यांस पाला घालावयाचें सुरू करावें. जसजसे किडे मोठे होत जातात, तसतसे ते मुपलींत दाट दिसूं लागतात. त्या वेळीं ते किडे पातळ करावेत. जाळीच्या साहाय्याने सर्व किडे लवकर पातळ करतां येतात. ज्या सुपलीतील किडे दाट असतील, तीवर जाळी पसरून त्यावर पातळ पाला पसरावा. अर्धे किडे जाळीवर आलेले दिसल्या- बरोबर ती जाळी उचलून दुसरे नवीन सुपलींत ठेवावी. ह्मणजे अर्धे किडे रिकाम्या सुपलींत व अर्धे पहिल्या सुपलींत आयतेच सारखे विरळ विरळ होतील. कात टाकल्यावर प्रत्येक वेळी किडे