पान:तुतीपासून रेशीम.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३ असावें, हें चांगलें. जाळ्यांच्या साहाय्यानें किड्यांखालचा कचरा रोज एक वेळ काढीत जावा. किडे पाळीत असतां हमेपा घरांतील हवा एकदम थंड किंवा उष्ण होऊं देऊं नये. चवथे अथवा पांचवे दिवशीं किडे कात टाकावयास सुरवात करितात. किडे कात टाकावयास केव्हां सुरवात कर- तात, हें जाणणें अत्यवश्यक आहे. जाळ्यांच्या साहाय्याने किडे कात टाकावयास केव्हां सुरुवात करतात, हे समजण्यास बरीच मदत होते. प्रत्येक वेळी जाळी उचलतांना सर्व किडे जाळीवर आले कीं नाहीं, हें पहात असतां जर कांहीं किडे खालीं राहिलेले आढळण्यांत येतील, व ते कांहीं हालचाल करीत नाहींत असें दिसत असेल, तर कांत टाकीत आहेत, असें समजावें. मागें सांगितल्याप्रमाणें खालील सुपलींत थोडे किडे शिल्लक असल्यास बेंचून दुसरे सुपलीत टाकून त्यांस पाला घालावा. व पुढे त्या वेळेपासून चौबीस घंटे पाला घालण्याचें बंद करावें. जर अर्धे अधिक किडे खालीं राहिलेले आढळतील तर ते सर्व कात टाकीत आहेत असें समजून ती सुपली निराळे चौखुरावर ठेवावी व वरील दुसऱ्या मुपल्यांतल्या किड्यांस एक वेळ पाला घालून पुढे चौवीस तास बंद करावा. किड्यांचा अर्धा भाग पांढरा व अर्धा मळकट असा ज्या वेळीं दिसत असेल, त्या वेळीं किडे कात टाकीत आहेत, असें समजावें. परंतु हैं फार बारकाईनें पाहिलें असतां मात्र दिसतें. पिशवीतून बाहेर पडावें, त्याप्रमाणे किडे आपले अंगावरील कात टाकतात.