पान:तुतीपासून रेशीम.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ मोठे होत जातील, तसा त्यांना वाढत्या प्रमाणावर पाला घालीत जावें. ह्मणजे, अंड्यांतून फुटल्या दिवशीं त्यांस एक शेर पाला पुरे होतो. दुसन्या दिवशीं दीड शेर, तिसऱ्या दिवशी तीन शेर, चवथ्या दिवशीं साडेतीन शेर, व पांचव्या दिवशीं चारशेर याप्रमाणें दरदिवशीं किड्यांना वाढत्या प्रमाणा- वर, ते किडे पहिल्यानें कात टाकण्यास सुरवात करी पावेतों पांच शेरांपर्यंत पाला वाढवीत न्यावा. प्रत्येक वेळीं किड्यांचे मानाप्रमाणें पाला कापून घालीत जावा. कित्येक ठिकाणीं किडे लहान असतांना रोज चार वेळ पाला घालतात. व कित्येक ठिकाणीं पांच वेळ प्रमाणें पाला घालतात. किडे लव- कर वाढून चांगले जोरदार व्हावेत, ह्मणून दोन वेळ कांत टाकी पावेतों रोज पांच वेळ पाला घालावा हैं बरें. पाला घालण्याच्या वेळा दिवसा तीन वेळ व रात्री दोन वेळ, या प्रमाणें नियमित असाव्या. ह्मणजे सकाळी सात वाजतां, दुपारी बारा, सायंकाळीं पांच, रात्री नऊ, व पहाटे चार वाजतां, याप्रमाणें पाला घालावयाच्या वेळा ठेवाव्या. वक्त- शीरपणाने पाला घालण्यांत बिलकुल फरक करूं नये. वेळच्या वेळी किड्यांस रोज पाला घालीत गेल्यास अन्नाच्या नियमितपणामुळे किडे चांगले जोरदार होतात. किडे लहान असतांना दाटीनें ठेवू नयेत. नाहीं तर ते कोसले लहान घालतील. लहानपणी किडे दाट ठेवल्यानें जितका अनिष्ट परिणाम होतो, तितका किडे मोठे झाल्यावर दाट "ठेवले असतां होत नाहीं. तरी पण किडे नेहमीं विरळ ठेवीत