पान:तुतीपासून रेशीम.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८१ तील किडे एका सुपलींत ठेवल्यावर त्यावर पुन्हां पाला चारीक कापून घालावा. नवा पाला घातल्याबरोबर खालचे व वरचे जाळींतील किडे वरील पाल्यावर येतात, व या- प्रमाणें पाहिजे तितके किडे एका सुपलीत अंड्यांचे कागद झटकल्याशिवाय घेतां येतात. कोंबडीची पिसें अथवा काड्या वापरण्याचें कारण हें कीं, सुपलींत किडे पसरतांना ते दाबले अथवा चिरडले न जातां हलक्या हातानें पसरले जावे. अंडीं जर निस्तरी किड्यांची असतील, तर एकशें वीस शेर कोसले तयार करावयास एक हजार, बड्या कि- ड्यांचीं असतील तर पांचशे, व छोट्या किड्यांची असतील तर बाराशे मागवावी. एकशेवीस शेर कोसले तयार करणारे किडे अंड्यांतून फुटल्यावर त्यांस पांच फुटाच्या व्यासाच्या सुपलीचा अर्धा भाग लागेल, ह्मणजे सर्व अंडी फुटलीं असतील, तर ते सर्व किडे पसरतांना अर्धी सुपली व्यापली जाईल, अशा रीतीनें चक्कीचें मान ठेवावें. किडे जर आजू- बाजूस असतील, तर कोंबडीच्या अथवा शहामृगाच्या पिसानें हलक्या हातानें सारून चक्कींतल्या पाल्यावर जातीलसे सारा- चेत. किडे अंड्यांतून फुटल्यावर ते केसापेक्षां जरा जाड असतात. किडे दहा बारा दिवसांचे होई पावेतों पाला घालावयाचा तो किडे ज्या जाडीचे असतील, तितक्या जाडीचा कमी जास्त पाला चिरून घालीत जावा. जसजसे किडे वाढत जातील, तसतसा त्यांस वाढत्या प्रमाणावर पाला मोठा मोठा चिरून घालीत जावा. किडे जसजसे