पान:तुतीपासून रेशीम.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० सकाळी सहा वाजतां सर्व कागद वाळत घातलेल्या दोरी- वरून काढून सुपल्यांत पसरून ठेवावे. दुपारचे तीन वाजाव- याचे सुमारास कोवळा कोवळा पाला आणून सुरीनें बारीक केसासारखा चिरावा, व अंड्यांच्या कागदावर फुटलेले किंडे अस्ताव्यस्त पसरले असतील त्यांवर तो विरळ विरळ पसरावा. अर्ध्या तासानंतर सर्व किडे त्या पाल्यावर आलेले आढळतील. नंतर सुपल्यांपैकीं एक सुपली चांगली झाडून घेऊन तींत कागद पसरावा. व पाल्यावरील किड्यांसकट अंड्यांचा कागद उचलून त्या सुपलींत हळूच झटकावा; ह्मणजे सर्व किडे पाल्यासकट सुपलींत पडतील. याप्रमाणें पाल्यासकट कागदावरील किडे सुपलींत झटकून घ्यावेत. नंतर कोंबडीची पिसें हातांत घेऊन अथवा दोन काड्या दोन हातांत घेऊन किड्यांसकट पाल्याचे झुपकेच्या झुपके कागदावर पडलेले असतील ते आपण पिसांनी हलक्या हाताने सर्व सुपलीत विखरावे. विखरतांना अथवा पसरतांना पाल्यासकट किडे विरळ विरळ राहतील, अशी एक चौकोनी अथवा गोल चाकी करावी. कित्येक ठिकाणीं सुपलींत अंड्यांचे कागद सर्व अंडीं सुपलींत राहतील अशा रीतीनें पसरून, अंडी फुटल्यावर त्यावर जाळी पस- रून पाला घालतात. व सर्व किडे पाल्यावर आल्यावर जाळी उचलून दुसऱ्या सुपलीत ठेवतात. किडे फारच विरळ असतील, तर दुसन्या सुपलीतील किड्यांसकट जाळी काढून जाळीवर दुसरी जाळी ठेवतात. दोन जाळ्यां-