पान:तुतीपासून रेशीम.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७९ ह्मणून वारंवार स्वच्छ पाणी बदलीत जावें. मोरचुदाचे पाण्यांत धुण्याचें कारण असें कीं, वाईट अंड्यांचा कागदा- दांवरील भाग कापून टाकल्यावर त्यावर असलेले रोगट जंतु जर कागदावर अवांतर ठिकाणीं फैलावले असतील, तर ते सर्व मरून जावेत. तसेंच दूर ठिकाणाहून अंडी आणवलीं असतील, व वाटेंत निरनिराळ्या थंड व उष्ण हवेचा दूषित परिणाम झाला असेल, तर मोरचुदाच्या पाण्याने धुत- ल्याने त्यांचा दोष नाहींसा होतो. व त्यावर असलेले रोगट जंतुही मरून जातात. हवेच्या फेरफारांत असलेली अंडी, तसेंच अतिशय उष्ण हवेंत राहिलेली अंडी, यांपासून होणारे किडे काजळ्या रोगानें व्यापले जातात. हा दोष मोरचुदाचे पाण्याने अंडी धुतल्यास नाहींसा होतो. तसेंच सर्व अंडी एके वेळी फुटण्यासही या धुण्याने मदत होते. कागद वाळत टाकावयाचे ते सावलीत टाकावेत. उन्हाचीं किरणें अंड्यांस लागल्यास अंडीं तांबूस पडून तीं फुटणार नाहींत. मोरचु- दाचे पाण्याने धुतल्यानंतर अंड्यांचे कागद किडे पाळाव याचे घरांत न्यावे. कागद वाळत घालावयाचे तेच जर किडे पाळावयाचे बरांत वाळत घातले, तरी हरकत नाहीं. अंडी अथवा किडे जितके समान उष्णतेच्या हवेंत ठेवावे तितकें चांगलें; इतकेंच नव्हे, पण त्याचा परिणाम उलट फार फायदेशीर होतो. सकाळचे सात वाजल्यापासून दुपारी तीन वाजे पावेतों अंडी फुटावयाचें काम चालूच असतें. ज्या दिवशीं अंडी फुटतील किंवा फुटणार असतील, त्या दिवशी