पान:तुतीपासून रेशीम.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ दाचे पाण्याचे टप्यांतून जे रोगट जंतु जिवंत राहिले अस- तील, ते गंधकाच्या भपकाऱ्याने मरून जातील. तदनंतर त्रियांचे कागद आणावे. अंडी फुटावयास जर दोन चार दिवस अवकाश असेल, तर ते कागद शुद्ध केलेल्या वरांत आणूं नयेत. किड्यांनी अंडी घातल्यापासून तीं फुटाव- याच्या लायकीची होईपर्यंत त्यांचा रंग पांढरा असतो. अंडी फुटावयाच्या आधी दोन दिवस त्यांचा थोडा भाग काळसर दिसूं लागतो. व दुसरे दिवशीं सर्व अंडी काळसर पारवीं दिसूं लागतात. ज्या दिवशी अंडी पूर्ण काळसर पारवीं दिसतात, त्याचे दुसरे दिवशीं अंडी फुटून किडे बाहेर येतात. अंडी काळसर पारवीं झालीं, ह्मणजे एक भाग मोरचुदाची भुकणी व शंभर भाग पाणी यांचे मिश्रण तयार करावें; ह्मणजे पांच तोळे मोरचूद व सवासहा शेर पाणी यांचे मिश्रण करून त्या मिश्रणाचा एक जीव झाला, ह्मणजे अंड्यांचे कागद त्या पाण्यांत दहा बारा सेकंदें बुड- वून नंतर स्वच्छ पाण्यांत ते कागद बुचकळून काढावे, व नंतर दोरीवर धुणे वाळत घालतों, त्याप्रमाणे ते कागद वाळत घालावे. कित्येक ठिकाणीं दोन वेळ स्वच्छ पाण्यांत कागद बुचकळतात व नंतर वाळत घालतात. मोरचुदाचे पाण्यांत कागद बुडवून काढून नंतर स्वच्छ पाण्यांत बुचकळण्याचें कारण हें कीं, मोरचुदाचा अणुरेणु इतकाही अंश अंड्यां- वर राहू देऊ नये. असा अंश ज्या अंड्यांवर राहतो, तीं अंडी फुटणार नाहीत. मोरचुदाचा अंश कागदावर राहू नये,