पान:तुतीपासून रेशीम.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७७ किड्यांस पाला योग्य वेळीं मिळतो कीं नाहीं, हें पाहिलें ह्मणजे झाले. किड्यांचें सशास्त्र संगोपन करणें हें हा धंदा आरंभणाराचें आदिकर्तव्य होय. आणि तसेंच त्यांस पाला वक्तशीर घातला जातो कीं नाहीं, याकडे विशेष लक्ष ठेवलें पाहिजे. आपणापाशीं ज्या मानानें पाला असेल, त्या मानानें वी आणावें. आतां आपल्यापाशीं साठ मण पाला आहे, असे गृहीत धरून चालूं या. एक एकराच्या लाग- वडमधून दर हंगामास साठ मण पाला मिळणें ह्मणजे कांहीं कठिण नाहीं. साठ मण पाला असेल, तर एकशेवीस शेर कोसले तयार करण्याची अंडी आपणास मागविली पाहिजेत. तसेंच साठ सुपल्या, चाळीस चंदर क्या, एकशेवीस जाळ्या, पांच चौखुर, एक सुरी, ठोकळा, किडे पाळण्याकरितां घर, मोरचूद, गंधक वगैरे सामान जय्यत तयार ठेवले पाहिजे. वरीलपैकीं कांहीं तुटण्याफुटण्याजोगें सामान थोड्या अधिक प्रमाणानें जरूरीपेक्षां जास्त संग्रही ठेवणें विशेष बरें. ज्या घरांत किडे पाळावयाचे असतील, तें घर मोरचुदाच्या पाण्याच्या मिश्रणाने धुवून सारवून ठेवावें, व तसेंच बाकीचें देखील सर्व सामान मोरचुदाच्या पाण्याने धुवून घरांत व्यवस्थेशीर किडे पाळीत असतांना ज्या स्थितीत तें सामान असतें, त्याप्रमाणें तें लावून ठेवावें. व नंतर पावशेर गंध- काची पूड पणतीत घालून त्यांतील गंधकानें जाला पेट घेतल्यावर घरांत आणून ठेवून सर्व दारे, खिडक्या व गवाक्षद्वारे चौसि तास बंद करून ठेवावी. ह्मणजे मोरचु-