पान:तुतीपासून रेशीम.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ कोळ साहित्य लागतें. तेंही अवश्य तयार ठेवावें. पाला आण- ल्यावर तो ठेवण्यास तरट लागत असतें. तसेंच कपडा ओला करून तो पाला न वाळावा ह्मणून उपयोगांत ध्यावा लागतो. रात्रीचे वेळीं काम करावें लागतें, त्या वेळे पुरता दिवाही लागत असतो. तसेंच, गंधकाची धुरी देण्यास मातीची भांडी व भपकारा देण्यास कुंडे, कोसले ठेवण्यास पाट्या, पाणी आणण्यास घागर, वगैरे किरकोळ सामान लागत असतें. किडे पाळणें. सर्व साहित्य तयार असल्यावर किडे पाळण्यास सुरुवात करावी. किडे पाळण्याचे काम फार अवघड आहे, असें प्रथम दर्शनीं वाटतें. पण इतकें सोपें काम दुसरें नाहीं, असें अनुभवाअंती प्रत्येकास कळून येईल. अवांतर नौकन्या करून कोणीही हा धंदा करूं शकतात. दिवसांतून माल- काची किड्यांवर चार घंटे नजर असली, ह्मणजे किडे पाळावयाचें सर्व काम चाकराकडून सहज होण्यासारखें - आहे. घराभोंवतीं झाडें असल्यास, अथवा एक एकराची लागवड करून, एक इसम नौकरी संभाळून दोन तीनशें रुपये सहज मिळवू शकेल. हैं काम चालत असतांना त्याच्या क्रिया घरांतील माणसांनीं पाहिल्यास वेळीं अवेळीं तींही नौकरांकडून काम करवूं शकतात. नौकर चाकर माणसें टिपलेले काम वेळच्या वेळीं करितात कीं नाहीं, तसेंच सर्व